________________
64
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ( उत्तरार्ध)
खंड : 1 विवाहितांसाठी ब्रह्मचर्याची चावी
[1] विषय नाही, पण निडरता हे विष हे विज्ञान प्रत्येकाला, विवाहितालाही मोक्षाला घेऊन जाईल. पण ज्ञानींच्या आज्ञेनुसार चालले पाहिजे. एखादा डोक्याचा मिजाजवाला (खुमारीवाला) असेल, तो म्हणेल, साहेब मला दुसरे लग्न करायचे आहे. तर मी म्हणेल 'तुझ्यात ताकद हवी. पूर्वी करत नव्हते का लग्न? भरत राजाला तेराशे राण्या होत्या, तरीही मोक्षाला गेले! जर राण्या नडल्या(बाधक) असत्या तर मोक्षाला गेले असते का? तर मग काय बाधक आहे? अज्ञान बाधक आहे.
विषय हे विष नाही, विषयात निडरता (निर्भयता, निर्भीडता) हे विष आहे. म्हणून घाबरु नका. सर्व शास्त्रांनी जोर देऊन सांगितले आहे की, विषय हे विष आहे. कसे विष आहे ? विषय हे काय विष असू शकते? विषयात निडरता हे विष आहे. विषय जर विष असते, तेव्हा मग तुम्ही सर्व जर घरी राहत असाल आणि तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर मला तुम्हाला हाकलावे लागले असते, की 'जा उपाश्रयात,' इथे घरी पडून राहू नका. पण मला कोणाला हाकलावे लागते का?
भगवंताने जीवांचे दोन प्रकार सांगितले; एक संसारी आणि दुसरे सिद्ध. जे मोक्षात गेले त्यांना सिद्ध म्हटले जाते आणि बाकी सर्वच संसारी. अर्थात तुम्ही जर त्यागी असाल तरीही संसारी आहात आणि हे गृहस्थ पण संसारीच आहेत. म्हणून तुम्ही मनात काही ठेवू नका. संसार नडत नाही, विषय नडत नाही, काहीच नडत नाही, फक्त अज्ञान नडते. म्हणूनच मी पुस्तकात लिहिले आहे की विषय हे विष नाही, विषयात निडरता हे विष आहे.
जर विषय हे विष असते तर भगवान महावीर तीर्थंकर झालेच नसते. भगवान महावीरांनाही मुलगी होती. अर्थात विषयात निडरता हे