________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
पती, पती सारखा असेल की तो कुठेही गेला, तरी सुद्धा एक क्षण देखिल आपल्याला विसरत नाही असा असेल तर ठीक आहे, पण असे तर कधीच शक्य होत नाही. मग अशा पतीचे काय करायचे ?
62
या काळातील मनुष्य प्रेमाचे भुकेले नाहीत, विषयाचे भुके आहेत. जो प्रेमाचा भुका असतो त्याला विषय मिळाला नाही तरीही चालते. असे प्रेमभुके भेटले तर त्यांचे दर्शन करु. विषयभुके म्हणजे काय, तर संडास. संडास ही विषयक आहे.
जर कधी जिव्हाळ्याचे प्रेम असेल तर संसार आहे, अन्यथा विषय हे तर संडासच आहे. ते नंतर नैसर्गिक हाजतमध्ये गेले. त्याला हाजतमंद म्हणतात ना ? जसे सीता आणि रामचंद्रजी विवाहितच होते ना? सीतेला घेऊन गेले तरीही श्रीरामाचे चित्त सीतेत आणि केवळ सीतेतच होते. आणि सीतेचे चित्तही फक्त श्रीरामामध्येच होते. विषय तर चौदा वर्षे पाहिला देखिल नव्हता, तरीही चित्त एकमेकांशी जोडलेलेच होते. यालाच (खरे) लग्न म्हणतात. बाकी यांना तर हाजतमंद म्हणतात, नैसर्गिक हाजत!
म्हणजे पति असेल तर झंझट ना ? परंतु जर ब्रह्मचर्य व्रत घेतले असेल तर या विषयसंबंधी काही झंझटच नाही ना! आणि सोबत असे ज्ञान असेल मग तर (मोक्षाचे) कामच साधून घेणार !
या भगिनीचा तर निश्चय आहे की, 'एका जन्मताच मोक्षाला जायचे आहे. आता इथे राहणे शक्य नाही, म्हणून' एक अवतारीच व्हायचे आहे. अतः तिला सर्वच साधने उपलब्ध झाली, ब्रह्मचर्यची आज्ञा सुद्धा मिळाली!
प्रश्नकर्ता : आम्ही पण एकच अवतारी होणार का ?
दादाश्री : तुला अजून वेळ लागेल. तुझे सध्या आमच्या सांगण्याप्रमाणे चालु दे. एक अवतारी तर आज्ञेत आल्यानंतर, या ज्ञानात आल्यानंतर काम होईल. तसे तर आज्ञेशिवाय दोन-चार जन्मात मोक्ष होणारच आहे, परंतु ( जर संपूर्ण ) आज्ञेत राहीलात तर एक अवतारी होता येईल! ज्ञानात आल्यानंतर आमच्या आज्ञेत यावे लागते. अजून