________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
57
सोडले तर लटपटू लागतो. म्हणून सैल सोडू नका. ठाम रहायचे. मेलो तरी चालेल पण हा विषय तर नकोच असे ठाम राहिले पाहिजे.
आम्हाला (दादांना) तर लहानपणापासून हे आवडायचेच नाही. असे वाटायचे की लोकांनी यात का म्हणून सुख मानले असेल? तेव्हा मला वाटायचे की हा काय प्रकार ? आम्हाला तर लहानपणापासूनच थ्री विजनची पॅक्टीस (अभ्यास) झाली होती. म्हणून तर आम्हाला खूपच वैराग्य येत असे, यावर अतिशय किळस येत असे. आणि याच वस्तूसाठी ह्या लोकांची आराधना असते. याला म्हणावे तरी काय?
प्रश्नकर्ता : हा जो मागील तोटा आहे त्यास निश्चयाच्या आधारे मिटवू शकतो का?
दादाश्री : हो, सगळा तोटा मिटवू शकतो. निश्चय सर्व काही करु शकतो.
भारी उदयकर्म येतो तेव्हा ते आपल्याला हलवून टाकते. आता भारी उदयकर्माचा अर्थ काय? की आपण स्ट्रोंग रुममध्ये(मजबुत खोलीत) बसलेलो असू आणि बाहेर कोणी ओरडाओरडा करत असेल. मग जरी पाच लाख माणसे बोंबा मारत असतील की 'आम्ही मारुन टाकू' असे बाहेरुनच ओरडत असतील, तर ते आपल्याला काय करणार आहेत? बोंबलू द्या त्यांना. त्याच प्रमाणे इथे सुद्धा स्थिरता असली तर काहीही होणार नाही, पण जर स्थिरता तुटली की मग पुन्हा आपल्यावर परिणाम होईल. तात्पर्य हेच की वाटेल ते (उदय) कर्म येतील तेव्हा स्थिरतापूर्वक हे माझे नाही, मी शुद्धात्मा आहे अशा प्रकारे स्ट्रोंग राहिले पाहिजे. नंतर पुन्हा (कर्म) येतील सुद्धा, थोडा वेळ गोंधळातही टाकतील. पण जर आपली स्थिरता असेल तर काहीही होणार नाही.
ही मुले ब्रह्मचर्य पालन करतात ते मन-वचन-कायेने पालन करतात. मनाने तर बाहेरची माणसं पाळू शकतच नाहीत. सर्व वाणीने आणि देहाने पाळतात. आपले हे जे ज्ञान आहे ना, त्यामुळे मनानेही पाळता येते. मन-वचन-कायेने जर ब्रह्मचर्य पालन केले तर त्यासारखी महान शक्ति दुसरी कोणतीही उत्पन्न होऊ शकत नाही. त्या शक्तिमुळे