________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
45
प्रश्नकर्ता : वीर्याचे गलन होते हे पुद्गलच्या स्वभावात असते की, कुठेतरी आपले लिकेज होत असते म्हणून असे होते? ___ दादाश्री : आपण पाहिले आणि आपली दृष्टी बिघडली म्हणून वीर्याचा अमुक भाग ‘एक्झोस्ट' (स्खलित) झाला असे म्हटले जाते.
प्रश्नकर्ता : ते तर विचारांमुळे पण होत असते.
दादाश्री : विचारांमुळे सुद्धा 'एक्झोस्ट' होते, दृष्टीने पण एक्झोस्ट होते. तो 'एक्झोस्ट' झालेला माल मग डिस्चार्ज होत राहतो.
___ प्रश्नकर्ता : पण हे जे ब्रह्मचारी आहेत त्यांना तर असे काही संयोग नसतात, ते तर स्त्रियांपासून दूर राहतात. स्त्रियांचा फोटो ठेवत नाही, कॅलेन्डर ठेवत नाही, तरीसुद्धा त्यांचे डिस्चार्ज होत राहते. तर त्यांचे स्वाभाविक डिस्चार्ज नाही का म्हटले जाणार?
दादाश्री : तरी पण त्यांना मनात हे सर्व दिसत असते. दुसरे असे की, ते जर आहार जास्त घेत असतील आणि त्याचे वीर्य जास्त तयार होत असेल, त्यामुळे तो प्रवाह वाहून जाईल असेही होऊ शकते.
वीर्याचे स्खलन कुणाचे होत नाही? तर ज्याचे वीर्य खूप मजबूत झालेले असेल, खूप घट्ट झालेले असेल, त्याचे स्खलन होत नाही. हे तर सर्व पातळ झालेले वीर्य म्हणायचे.
प्रश्नकर्ता : मनोबळाने पण त्याला थांबवू शकतो ना?
दादाश्री : मनोबळ तर खूप काम करते! मनोबळच काम करते ना! पण ते ज्ञानपूर्वक असले पाहिजे. मनोबळ काही असेच राहत नाही ना!
प्रश्नकर्ता : स्वप्नात जो डिस्चार्ज होतो तो मागील तोटा आहे का?
दादाश्री : त्याचा काही प्रश्न नाही. हे मागील तोटे स्वप्नावस्थेत सर्व निघून जातील. स्वप्नावस्थेसाठी आपण अपराधी मानत नाही. आपण जागृत अवस्थेला अपराध मानतो, उघड्या डोळ्यांनी जागृत अवस्था!