________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
43
दादाश्री : आत्म्याची शक्ति खूप वाढते.
प्रश्नकर्ता : तर मग हे जे दर्शन आहे. जागृति आहे, हे आणि आत्मवीर्य या दोघांचे काय कनेक्शन (संबंध) आहे ?
दादाश्री : जागृति आत्मवीर्यात गणली जाते.
आत्मवीर्याचा अभाव असेल तर व्यवहाराचे सोल्युशन (निराकरण) न करता व्यवहाराला सरकवून बाजूला ठेवतो. जेव्हा की आत्मवीर्यवाला तर म्हणेल, वाटेल ते येऊ दे, तो विचलित होत नाही. आता ह्या सर्व शक्ति उत्पन्न होतील !
प्रश्नकर्ता : ह्या सर्व शक्ति ब्रह्मचर्यामुळे उत्पन्न होतात का ?
दादाश्री : हो, ब्रह्मचर्य चांगल्या प्रकारे पाळले गेले असेल तेव्हाच आणि त्यात जरा सुद्धा लिकेज होऊ नये. हे तर काय झाले आहे की, व्यवहार शिकलेले नाही आणि असेच हे सर्व हातात आले आहे.
जिथे रुची असेल तिथे आत्म्याचे वीर्य वर्तत असते. ह्या लोकांची रुची कशात आहे? आईस्क्रीममध्ये तर आहे, परंतु आत्म्यात नाही.
हा संसार आवडत नाही, सर्वात सुंदर वस्तु असेल तरीही ती जरासुद्धा आवडत नाही. फक्त आत्म्याचेच आवडत असते, आवडच बदलून जाते. आणि जेव्हा देहवीर्य प्रकट होते तेव्हा आत्म्याचे आवडत नाही.
प्रश्नकर्ता : आत्मवीर्य प्रकट होणे हे कशाने शक्य होते ?
दादाश्री : आमची आज्ञा पाळण्याचा निश्चय केला असेल, तेव्हापासून ऊर्ध्वगतीत जातो.
अधोगतीत जावे, अशी वीर्याला सवय नसते, स्वतःचा निश्चय नसल्यामुळे अधोगतीत जाणे होते. निश्चय केला की मग दुसऱ्या बाजूला वळते आणि मग त्याच्या चेहऱ्यावर सर्वांना तेज दिसू लागते. आणि जर ब्रह्मचर्य पाळत असताना जर चेहऱ्यावर असा काही परिणाम दिसून आला नाही, तर 'ब्रह्मचर्य पूर्णपणे पाळले नाही' असे म्हटले जाईल.