________________
44
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रश्नकर्ता : वीर्याचे ऊर्ध्वगमन होणे सुरु व्हायचे असेल तर त्याचे लक्षण काय?
दादाश्री : चेहऱ्यावर तेज येते, मनोबळ वाढत जाते, वाणी फर्स्ट क्लास निघते, वाणी गोडवा असतो. वर्तन गोड असते. ही सर्व त्याची लक्षणे असतात. त्यासाठी तर खुप वेळ लागतो, आताच्या आता हे सर्व शक्य होत नाही. लगेच होत नाही.
प्रश्नकर्ता : स्वप्नदोष का होत असेल?
दादाश्री : समजा वर पाण्याची टाकी असेल, आणि त्या टाकीतून पाणी खाली सांडायला लागले तर आपल्याला नाही का समजणार की, ती उतू गेली! स्वप्नदोष म्हणजे उतू जाणे. (सांडणे) टाकी उतू गेली ! मग कॉक ठेवायला नको का?
आहारावर कंट्रोल केला तर स्वप्नदोष होत नाही. म्हणूनच हे महाराज एकदाच आहार घेतात ना तिथे! आणखी काहीच घेत नाहीत, चहा वैगरे काहीच घेत नाहीत.
प्रश्नकर्ता : यात रात्रीचे जेवण महत्वाचे आहे. रात्रीचे जेवण कमी केले पाहिजे.
दादाश्री : रात्री जेवायचेच नाही. हे महाराज एकदाच जेवतात.
तरीही डिस्चार्ज झाले तर मग त्यास हरकत नाही. असे तर भगवंतांनी म्हटले आहे की त्यास हरकत नाही. टाकी भरली म्हणजे झाकण उघडे होते. जोपर्यंत ब्रह्मचर्य ऊर्ध्वगमन झाले नाही तोपर्यंत अधोगमनच होते. ब्रह्मचर्याचा निश्चय केला तेव्हापासूनच ऊर्ध्वगमन होण्यास सुरुवात होते.
आपण सावधानीने चाललेले चांगले. महिन्यातून चार वेळा झाले तरी हरकत नाही. आपण मुद्दाम डिस्चार्ज करु नये. तो अपराध आहे. त्यास आत्महत्या म्हणतात. आपोआप झाले तर हरकत नाही. हे तर सर्व उलट-सुलट खाल्ल्याचे परिणाम आहेत. डिस्चार्जची असी सूट कोण देणार? ती लोकं सांगतात, डिस्चार्ज तर व्हायलाच नको. तेव्हा म्हणा, मग काय मी मरु? विहीरीत उडी मारु?