________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
सीमाच राहणार नाही ना! मग तर असे परिवर्तन येते की विचारुच नका! कारण ब्रह्मचर्य हे तर पुद्गलसार आहे ना?
हे जे आपण सर्व खात असतो, पीत असतो, याचे पोटात काय होत असेल?
प्रश्नकर्ता : रक्त बनते. दादाश्री : या रक्ताचे मग काय तयार होते? प्रश्नकर्ता : रक्ताचे वीर्य तयार होते.
दादाश्री : असे का! वीर्याला समजतो का तू? रक्ताचे वीर्य बनते, मग त्या वीर्याचे काय तयार होते? रक्ताचे सात धातु आहेत असे सांगतात ना! यामधून एकापासून हाडं तयार होतात, एकातून मांस तयार होते, आणि सर्वात शेवटी वीर्य तयार होते. अंतिम अवस्था वीर्याची आहे. वीर्याला पुद्गलसार म्हटले जाते. दुधाचे सार म्हणजे तुप म्हटले जाते, त्याचप्रमाणे आहाराच्या साराला वीर्य म्हटले जाते.
लोकसार हे मोक्ष आहे आणि पुद्गलसार हे वीर्य आहे. जगातील सर्व पदार्थ अधोगामी आहेत. फक्त वीर्यच जर आपण ठरवले तर ऊर्ध्वगामी होऊ शकते. म्हणूनच वीर्य ऊर्ध्वगामी व्हावे अशी भावना केली पाहिजे.
प्रश्नकर्ता : ह्या ज्ञानात राहिलो तर आपोआप ऊर्ध्वगमन होईल ना?
दादाश्री : हो, आणि आपले हे ज्ञानच असे आहे की, जर ह्या ज्ञानात राहिले तर काही अडचण नाही, पण जेव्हा अज्ञान उभे राहते तेव्हा आत हा रोग तयार होतो. त्यावेळी जागृति ठेवावी लागते. विषयात तर अपार हिंसा आहे, खाण्यात-पिण्यात अशी हिंसा होत नसते.
या जगातील वैज्ञानिकांचे तसेच ह्या सर्व लोकांचे म्हणणे आहे की, वीर्य-रज हे अधोगामी आहेत. परंतु अज्ञानता आहे म्हणून अधोगामी आहेत. ज्ञानात तर ऊर्ध्वगामी होत असते. कारण ज्ञानाचा प्रताप आहे ना! ज्ञान असेल तर कोणतेही विकार उत्पन्न होतच नाहीत.
प्रश्नकर्ता : आत्मवीर्य प्रकट होते अर्थात यात काय होत असते?