________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
__41
ज्याला ब्रह्मचर्य पाळायचे आहे, त्याने ही दक्षता घेतली पाहिजे की, अमुक आहारने उत्तेजना वाढत जाते. म्हणून असा आहार कमी केला पाहिजे. चरबी वाढविणारा आहार जसे की, तूप-तेल(जास्त) नाही खायचे, दुधाचे प्रमाण सुद्धा कमी करावे, वरण-भात, भाजी-पोळी निवांतपणे खाऊ शकता परंतु त्याचेही प्रमाण कमी ठेवावे, ठासून खाऊ नये. अर्थात आहार इतकाच घेतला पाहिजे की ज्यामुळे त्याची नशा चढणार नाही, रात्री तीन-चार तासच झोप येईल इतकाच आहार घेतला पाहिजे.
इतक्या लहान लहान मुलांना तुपाच्या मिठाया आणि डिंकाचा पाक असे सर्व पदार्थ खाऊ घालतात, त्यामुळे नंतर त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो. ते खूप विकारी होऊन जातात. अर्थात असे पदार्थ लहान मुलांना जास्त प्रमाणात देऊ नये. यांचे प्रमाणे मोजकेच ठेवावे. ____ मी तर चेतावणी देतो की जर ब्रह्मचर्य पाळायचे असेल तर कंदमूळ खाऊ नये.
प्रश्नकर्ता : कंदमूळ नाही खाल्ले पाहिजे का?
दादाश्री : कंदमूळ खाणे आणि ब्रह्मचर्य पाळणे ही रोंग फिलॉसॉफी(चुकीचे दर्शन) आहे, विरोधी गोष्ट आहे.
प्रश्नकर्ता : कंदमूळ खाऊ नये, हे जीव हिंसा होते म्हणून हिंसेमुळे की मग त्यामागे दूसरे काही कारण आहे.
दादाश्री : ही कंदमूळे तर अब्रह्मचर्याला जबरदस्त पुष्टी देणारी आहेत. म्हणून असे नियम ठेवावे लागतात की ज्यामुळे त्यांचे ब्रह्मचर्य टिकून राहिल.
[13 ] नाही व्हावा असार, पुद्गलसार ब्रह्मचर्य हे काय आहे? ते पुद्गलसार आहे. जे आपण खात असतो, पित असतो, या सर्वांचे सार काय? तर 'ब्रह्मचर्य'! तुमचे हे सार जर निघून गेले तर आत्म्याचा जो त्याला आधार आहे, तो आधार 'लूज' (कमजोर) होऊन जाईल! अर्थात् ब्रह्मचर्य मुख्य वस्तु आहे. एकीकडे ज्ञान असेल आणि दुसरीकडे ब्रह्मचर्य असेल, तर सुखाची