________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
होतच राहिल्या आहेत, घासल्या जातच आहेत; म्हणून एके दिवशी सर्व संपूनच जाणार आहेत ना?!
दादाश्री : सैन्य म्हणजे काय? प्रतिक्रमण?
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण, दृढ निश्चय, असे सर्व सैन्य ठेवावे लागते आणि 'ज्ञानी पुरुष' यांचे दर्शन, या दर्शनापासून दूर झालात तरी खूप कठीण होऊन बसेल. सेफसाइड(स्वसुरक्षा) ही काही सोपी गोष्ट नाही.
प्रश्नकर्ता : संपूर्ण सेफसाइड केव्हा होईल, त्याचा तर काही नेमच नाही ना! पण पस्तीस वर्षांनंतर त्याचे दिवस मावळत जातात, म्हणून मग ते तुम्हाला जास्त हैराण करत नाहीत. त्यानंतर मग तुमच्या धारणेनुसार चालत राहते. ते तुमच्या विचारांच्या आधीन राहतात. तुमची इच्छा बिघडत नाही. नंतर तुम्हाला कोणी काही नुकसान करत नाही. परंतु वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत तर खूपच मोठे जोखिम आहे!
[12] तितिक्षाच्या तपाने तापवा मन-देह! प्रश्नकर्ता : ज्या दिवशी उपवास केला असेल, त्या रात्री वेगळ्याच प्रकारचा आनंद वाटतो, याचे कारण काय असेल?
दादाश्री : बाहेरचे सुख घेतले नाही म्हणून आतील सुख उत्पन्न होतेच. बाहेरचे सुख घेतात म्हणून आतील सुख प्रकट होत नाही.
आम्ही उणोदरी तप शेवटपर्यंत चालू ठेवलेले! दोन्ही वेळा आवश्यकतेपेक्षा कमीच खायचे, नेहमीसाठी! कमीच खायचे त्यामुळे आत निरंतर जागृति राहते. उणोदरी तप म्हणजे काय की दररोज चार पोळ्या खात असाल तर दोनच पोळ्या खाणे, याला उणोदरी तप म्हणतात.
प्रश्नकर्ता : आहारामुळे ज्ञानात किती बाधा येते?
दादाश्री : खूप बाधा येते. आहार खूप बाधक आहे. कारण की हा जो आहार पोटात जातो, त्यापासून दारू तयार होते अणि त्यामुळे मग संपूर्ण दिवस दारूची धुंद, नशाच नशा चढत राहते.