________________
38
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
आपणच त्याच्यासाठी फाईल झालो आहोत असे जर आपल्या लक्षात आले तर त्यासाठी आपण काय करावे?
__ दादाश्री : मग तर ते लवकरात उडवून द्यायचे. तिथे जास्त कडक व्हावे. म्हणजे मग ती कल्पना रंगवायचीच बंद करुन टाकेल. नाही तर काही तरी वेड्यासारखे बोलावे. तिला सांगावे 'माझ्या समोर आलीस तर चार थोबाडीत वाजवेल!' माझ्यासारखा चक्रम भेटणार नाही तुला. 'असे म्हटले की मग ती पुन्हा येणारच नाही. ही तर अशाच प्रकारे सुटका होईल.'
[10] विषयविकारी वर्तन? तर डीसमीस इथे कुणावर दृष्टी बिघडली तर ते चुकीचे म्हटले जाईल. इथे तर सर्वजण विश्वासाने येतात ना!
इतर ठिकाणी पाप केले असेल तर ते इथे आल्यावर धुतले जाते, परंतु इथे केलेल्या पापांना नर्कात भोगावे लागते. जे होऊन गेले असेल त्यांना लेट गो करा(जाऊ दया) परंतु नवीन तर होऊच द्यायचे नाही ना! आता जे होऊन गेले त्यावर काही उपाय आहे का?
पाशवीपणा करण्यापेक्षा लग्न केलेले बरे. लग्न करण्यात काय अडचण आहे? लग्नाचा पाशवीपणा तरी बरा, लग्न करायचे नाही आणि फालतू चाळे करायचे, याला तर भयंकर पाशवीपणा म्हटले जाते, ते तर नरकगतिचे अधिकारी! आणि ते तर इथे असायलाच नको ना? लग्न हा तर हक्काचा विषय म्हटला जातो.
ब्रह्मचर्य भंग करणे हा तर सर्वात मोठा दोष आहे. ब्रह्मचर्य भंग होते तेव्हा तर मोठे संकट, जिथे होतो तिथून खाली घसरलो. दहा वर्षांपूर्वी लावलेले झाड असेल आणि ते जर पडले तर ते आजच लावल्यासारखे झाले ना! आणि त्यामुळे मागील दहा वर्षे वाया गेली ना! अर्थात ब्रह्मचर्यवाला एकदा जरी अब्रह्मचर्यात पडला म्हणजे तो कामातून गेला.
प्रश्नकर्ता : निश्चय तर आहे पण चुका होतातच.