________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
आल्याबरोबरच मन वर खाली, वर खाली होत असते. आत तर नुसती घाणच भरलेली आहे, कचरा मालच आहे. आत आत्म्याचीच किंमत आहे!
फाईल गैरहजर असेल तरीही आठवत असेल तर त्यात खूप जोखिम आहे. फाईल गैरहजर असेल तेव्हा आठवण येत नाही पण ती जेव्हा समोर येते तेव्हा परिणाम होत असेल तर ते सेकंडरी जोखिम. आपल्यावर त्याचा परिणाम होऊच देऊ नये. स्वतंत्र होण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी आपली लगामच(ताबा) तुटून जाते. मग लगाम राहतच नाही ना!
ज्याची फाईल (अशी व्यक्ति जिच्यासाठी विशेष आकर्षण, ओढ असेल) झालेलीच असेल, त्याच्यासाठी खूप जोखिम आहे. त्या व्यक्तिसोबत कठोर राहावे. समोर आली तर डोळे वटारावे, मोठे करावे, ज्यामुळे ती फाईल तुला घाबरेल. उलट फाईल झाल्यावर लोकं चप्पल मारतात, ज्यामुळे मग ती व्यक्ति पुन्हा कधी तोंडच दाखवत नाही.
प्रश्नकर्ता : फाईल असेल, आणि त्याच्यावर आपल्याला तिरस्कार उत्पन्न होत नसेल तर मुद्दाम तिरस्कार उत्पन्न करायचा का?
दादाश्री : हो. तिरस्कार का उत्पन्न होणार नाही? जो आपले इतके सारे अहित करत आहे, त्याच्यावर तिरस्कार उत्पन्न नाही होणार का? याचा अर्थ अजून तुम्हाला त्यात रस आहे! दानत खराब आहे तुमची!
प्रश्नकर्ता : खूप परिचय झाला असेल तर त्याच्यासोबत अपरिचय कसा करावा? तिरस्कार करुन करावा का?
दादाश्री : 'माझी नाही, माझी नाही' असे करुन, खूप प्रतिक्रमण करावे. नंतर जेव्हा समोर भेटली तेव्हा तिला ऐकवून द्यायचे की, काय तोंड घेऊन फिरतेस, जनावरा सारखी, युजलेस!' म्हणून मग ती पुन्हा कधी तोंड दाखवणार नाही.
प्रश्नकर्ता : समोरील व्यक्ति आपल्यासाठी फाईल नाही परंतु