________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
चित्तवृत्ति जितकी भटकेल तितके आत्म्याला भटकावे लागते. जिथे चित्तवृत्ति जाईल, तिथे आपल्याला जावे लागेल. चित्तवृत्ति नकाशा काढत असते. पुढील जन्मासाठी येण्या-जाण्याच नकाशा तयार करते. त्या नकाशाप्रमाणे मग आपल्याला फिरावे लागते. कुठे-कुठे भटकत असेल चित्तवृत्ति ?
35
प्रश्नकर्ता : चित्त जिथे-तिथे अडकत नाही, परंतु एखाद्या ठिकाणी जर ते अडकत असेल तर तो मागील जन्माचा हिशोब आहे का ?
दादाश्री : हो, हिशोब असेल तरच अडकणार. पण आता आपल्याला काय करायचे आहे ? पुरुषार्थ तर त्यास म्हणतात की, जिथे हिशोब असेल तिथे सुद्धा अडकू देणार नाही. चित्त गेले की लगेच (प्रतिक्रमण करुन) धुऊन टाकले, तोपर्यंत अब्रह्मचर्य धरले जात नाही. चित्त गेले आणि धुऊन नाही टाकले तर मात्र ते अब्रह्मचर्य धरले जाईल. जे चित्ताला डगमगवतात ते सर्वच विषय आहेत. ज्ञानाच्या बाहेर ज्या-ज्या वस्तुत चित्त जाते, ते सर्वच विषय आहेत.
प्रश्नकर्ता : आपण सांगितले की विचार काहीही आले तरी त्यास हरकत नाही, परंतु चित्त तिथे जाते त्यास हरकत आहे.
दादाश्री : हो चित्ताचीच झंझट आहे ना ! चित्त भटकते हीच झंझट ! विचार तर वाटेल ते असतील, त्यास हरकत नाही. परंतु हे ज्ञान मिळाल्यानंतर चित्त मागेपुढे व्हायला नको.
प्रश्नकर्ता : जर कधी झाले, तर त्याचे काय ?
दादाश्री : आपल्याला तिथे 'पुन्हा असे होणार नाही' असा पुरुषार्थ करावा लागेल. पूर्वी जेवढे जात होते तितकेच आता सुद्धा जाते का ?
प्रश्नकर्ता : नाही, तेवढे स्लीप होत नाही, तरी सुद्धा मी विचारतो.
दादाश्री : नाही, परंतु चित्त तर जायलाच नको. मनात वाटेल तितके खराब विचार येतील त्यास हरकत नाही, त्यांना बाजूला सारत राहायचे. त्यांच्यासोबत बोलचालीचा व्यवहार (संवाद) करा की अमकी व्यक्ति भेटली तर काय कराल ? त्याच्यासाठी ट्रक, मोटार कुठून आणाल ?