________________
34
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
बांधलेला असेल आणि त्यात जर रमणता झाली तर समजावे की इथे फार मोठा हिशोब आहे म्हणून तिथे जास्त जागृति ठेवावी. त्याच्यावर प्रतिक्रमणाचे तीर सतत मारत रहावे. आलोचना-प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान जबरदस्त करावे लागते.
विषय ही अशी वस्तु आहे की, मन आणि चित्त ज्याप्रमाणे राहत असेल त्याप्रमाणे त्यांना राहू देत नाही आणि एकदा का यात पडलो की मग त्यातच आनंद मानून चित्त वारंवार तिथल्या तिथेच जात राहते आणि 'खूप छान आहे, खूप मजा आहे' असे मानून त्यात असंख्य बीज पडत राहतात.
प्रश्नकर्ता : पण ते पूर्वीचे तसे घेऊन आलेला असतो ना?
दादाश्री : त्याचे चित्त तिथल्या तिथेच जात असते, ते पूर्वीचे घेऊन आलेला नाही परंतु मग त्याचे चित्त सटकूनच जाते हातातून ! स्वत:ची इच्छा नसते तरीही सटकून जाते. म्हणूनच ही मुले जर ब्रह्मचर्याच्या भावनेत राहिली तर उत्तम, आणि मग जे आपोआप स्खलन होते, तर ते गलन आहे. स्खलन रात्री होते, दिवसा होते ते सर्व गलन म्हटले जाते. पण ह्या मुलांना एकदा जरी विषयाने स्पर्श केला असेल तर मग रात्रंदिवस त्याचीच स्वप्ने पडतात.
तुला असा अनुभव आहे का, की जेव्हा विषयात चित्त जाते तेव्हा ध्यान (स्थिरता) बरोबर राहत नाही?
प्रश्नकर्ता : चित्ताने जर सहजही विषयाच्या स्पंदनांना स्पर्श केला असेल तर कितीतरी काळापर्यंत स्वतःची स्थिरता राहू देत नाही.
दादाश्री : अर्थात माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की, तुम्ही संपूर्ण जगात फिरा, पण जर जगातील कोणतीही वस्तु तुमच्या चित्ताचे हरण करु शकली नाही, तर तुम्ही स्वतंत्र आहात. गेली कित्येक वर्षांपासून मी माझ्या चित्ताला पाहत आहे की त्यास कोणतीही वस्तू हरण करु शकत नाही, म्हणून मग मी स्वतःला ओळखले की, मी संपूर्णपणे स्वतंत्र झालो आहे. मनात वाटेल तसे खराब विचार आले तरी हरकत नाही, पण चित्ताचे हरण तर नाहीच झाले पाहिजे.