________________
36
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
अथवा सत्संगाच्या गोष्टी केल्या की मग मन परत नवीन विचार करायला लागेल.
सर्वात जास्त चित्त कशात फसते? विषयात. आणि एकदा चित्त विषयात फसले की तेवढेच आत्मऐश्वर्य तुटले. ऐश्वर्य तुटले म्हणजे जनावर बनला. अर्थात विषय अशी वस्तु आहे की, यातूनच पाशवता आली आहे. मनुष्यातून जनावरपणा विषयामुळेच आला आहे. तरी सुद्धा आम्ही काय सांगतो की हा तर पूर्वीचा भरलेला माल आहे, तो तर निघणारच परंतु आता मात्र नव्याने माल भरु नका, हे उत्तम म्हटले जाईल.
[9] फाईल समोर कठोरता! प्रश्नकर्ता : ते जर मोहजाळ टाकतील तर त्यातून कसे वाचावे?
दादाश्री : आपण दृष्टीच मिळवू नये. आपण ओळखावे की, ही जाळ्यात फसवणारी आहे, म्हणून तिच्यासोबत दृष्टीच मिळवू नये.
जिथे आपल्याला वाटते की इथे फसण्यासारखे आहे अशा व्यक्तिला भेटूच नये.
कुणासोबतही नजरेला नजर मिळवून बोलू नये, नजर खाली ठेवूनच बोलावे. दृष्टीनेच सर्व बिगडते. अशा दृष्टीत विष असते आणि मग हे विष चढते. म्हणूनच दृष्टी मिळवली असेल, नजर आकर्षित झाली असेल तर लगेचच प्रतिक्रमण करुन घ्यावे, इथे तर निरंतर सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्याला हे जीवन बिघडवू द्यायचे नसेल त्याने सावध राहावे.
मन ओढले जात असेल, अशी फाईल(व्यक्ति) जेव्हा समोर येते तेव्हा मन चंचलच होत राहते.
तुमचे मन जेव्हा चंचल होते तेव्हा आम्हाला खूप दुःख वाटते. ह्याचे मन चंचल झाले होते. म्हणून आमची दृष्टी त्याच्यावर कडक होते.
फाईल येते त्यावेळी आत तुफान माजवते. त्याचे विचार