________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
39
दादाश्री : दुसऱ्या ठिकाणी चुका झाल्या तर चालवून घेऊ. परंतु विषय संयोग व्हायला नको.
दोन कलमे(गोष्टी) लिहावी. असे लिहावे की, आमच्याकडून जर विषयविकारी वर्तन झाले तर आम्ही स्वत:च इथून निवृत्त होऊ, कोणालाही आम्हाला निवृत्त करावे लागणार नाही. आम्ही स्वत:च हे स्थान सोडून निघून जाऊ. आणि दूसरे म्हणजे दादाश्रींच्या हजेरीत प्रमाद झाला अर्थात दादाजींच्या उपस्थितीत झोपेची डुलकी आली तर त्यावेळी संघ जी शिक्षा करेल ती आम्हाला मान्य आहे. मग ती शिक्षा तीन दिवस उपाशी राहण्याची असो किंवा अशी कोणतीही शिक्षा असो, तरी त्याचा आम्ही स्वीकार करु.
[11] सेफसाइड पर्यंतचे कुंपण.... ब्रह्मचर्य पालन करता यावे यासाठी इतकी कारणे तर असायला हवीत. त्यात पहिले म्हणजे आपले हे 'ज्ञान' असायला हवे. ब्रह्मचारींचा समुह हवा. ब्रह्मचारींसाठी असलेली राहण्याची जागा शहरापासून थोडी दूर असायला हवी आणि त्याचसोबत त्यांचे पोषण व्हायला हवे. असे सर्व 'कॉजेस' (कारणे) असायला हवेत.
__ प्रश्नकर्ता : याचा अर्थ असा झाला की 'कुसंग' 'निश्चयबळाला' तोडून टाकते?
दादाश्री : हो, निश्चयबळाला तोडून टाकते! अरे, माणसाचे संपूर्ण परिवर्तनच करुन टाकते. आणि सत्संग सुद्धा माणसाचे परिवर्तन करुन टाकतो. परंतु एकदा कुसंगामध्ये गेलेल्या व्यक्तिला पुन्हा सत्संगामध्ये आणायचे असेल तर खूप कठीण होते आणि सत्संगवाल्या व्यक्तिला जर कुसंगी बनवायचे असेल तर जरा सुद्धा वेळ लागत नाही.
प्रश्नकर्ता : सर्व गाठी आहेत, त्यात विषयविकाराची गाठ जरा जास्त त्रास देते.
दादाश्री : काही गाठी जास्त त्रास देतात. त्यासाठी आपल्याला सैन्य तयार ठेवावे लागते. या सर्व गाठी तर हळूहळू एक्झोस्ट (खाली)