________________
32
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रश्नकर्ता : ही मान्यता उभी होते, ती संयोग जुळून आल्यामुळे होते का?
दादाश्री : लोकांनी सांगितल्यामुळे आपली मान्यता तयार होते आणि आत्म्याच्या हजेरीत मान्यता झाल्यामुळे ती दृढ होते. नाहीतर यात असे आहे तरी काय? नुसते मांसाचे गोळे आहेत! ___मनात विचार येतात, ते विचार आपोआपच येत राहतात, त्यांना आपण प्रतिक्रमण करुन धुऊन टाकावे. नंतर वाणीत असे बोलू नये की, विषय भोगणे हे खूप चांगले आहे तसेच वर्तनातही असे ठेवू नये. स्त्रियांसोबत दृष्टी मिळवू नये. स्त्रियांना पाहू नये. स्पर्शे नये. स्त्रियांना स्पर्श जरी झाला असेल तरी मनात प्रतिक्रमण झाले पाहिजेत, कि 'अरेरे, हिचा स्पर्श का झाला?! कारण की स्पर्शामुळे विषयाचा असर होत असतो.
प्रश्नकर्ता : याला तिरस्कार केले असे नाही का म्हटले जाणार?
दादाश्री : याला तिरस्कार म्हटले जात नाही. प्रतिक्रमण करताना आपण त्याच्या आत्म्याला सांगत असतो की 'आमची चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही अशी शक्ति द्या.' तिच्याच आत्म्याला असे म्हणायचे की मला, शक्ति द्या. जिथे आपली चूक झाली असेल, तिथेच शक्ति मागावी म्हणून मग शक्ति मिळत राहते.
प्रश्नकर्ता : स्पर्शाचा परिणाम होतो ना?
दादाश्री : त्यावेळी आपण मन संकुचित करुन घ्यावे. मी ह्या देहापासून वेगळा आहे, मी 'चंद्रेश'च नाही, असा उपयोग राहायला हवा, शुद्ध उपयोग राहिला पाहिजे. कधीतरी असे घडले तर तेव्हा शुद्ध उपयोगातच राहावे, की 'मी चंद्रेश'च नाही. स्पर्श सुख घेण्याचा विचार आला तर त्यास येण्यापुर्वीच उपटून फेकून द्यावे. जर लगेच उपटून फेकले नाही तर पहिल्या सेकंदात झाड बनून जाते, दुसऱ्या सेकंदात ते आपल्याला कचाट्यात घेते आणि तिसऱ्या सेकंदानंतर फाशीवर चढण्याची वेळ येते.
हिशोब नसेल तर स्पर्शही होत नाही. स्त्री-पुरुष एका खोलीत असतील तरी विचार सुद्धा येत नाहीत.