________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
31
प्रश्नकर्ता : ही गाठ विरघळली(संपली) मग तर आकर्षणाच व्यवहारच उरणार नाही ना?
दादाश्री : तो व्यवहारच बंद होऊन जातो. टाचणी आणि लोहचुंबकाचा संबंधच बंद होऊन जातो. तो संबंधच राहत नाही. या गाठीमुळेच हा व्यवहार चालू आहे ना! विषयाचा व्यक्ति स्वभाव आहे आणि आत्म्याचा सूक्ष्म स्वभाव आहे. अशी जागृति राहणे खूप कठीण आहे, त्यामुळे यात एकाग्रता झाल्याशिवाय राहतच नाही ना! हे तर ज्ञानी पुरुषांचे काम आहे, दुसऱ्या कुणाचे कामच नाही!
विषयाची गाठ मोठी असते, तिला निर्मुलन करण्याची खूपच गरज आहे, म्हणून नैसर्गिक रित्याच आपल्या इथे हे सामायिक चालू झाले आहे! सामायिक करा, सामायिकने सर्व निर्मूळ होते! काहीतरी तर करावे लागेल ना! दादाजी आहेत तोपर्यंत सर्व रोग काढावा लागेल ना? एखादी गाठच मोठी असते, पण जो रोग आहे तो तर काढावाच लागेल ना? ह्या रोगामुळेच अनंत जन्म भटकले आहात ना? ही सामायिक तर कशासाठी आहे की, विषयभावाचे बीज अजूनपर्यंत गेलेले नाही आणि या बिजातूनच नवीन चार्ज होते, या विषयभावाचे बीज निर्मूळ करण्यासाठीच ही सामायिक आहे.
[8] स्पर्श सुखाची भ्रामक मान्यता विषयाच्या घाणीत लोक पडले आहेत. विषयाच्या वेळी उजेड केला तर स्वतःला ही आवडत नाही. उजेड झाला तर घाबरतात. म्हणूनच अंधार ठेवतात. उजेड असेल तर भोगण्याची जागा बघायला आवडत नाही. म्हणूनच कृपाळुदेवांनी भोगण्याच्या स्थानाला काय म्हटले आहे ?
प्रश्नकर्ता : ‘वमन करण्यायोग्य सुद्धा ही वस्तु नाही.' तरीही स्त्रीच्या अंगाकडे आकर्षित होण्याचे कारण काय असेल?
दादाश्री : आपली मान्यता. रोंग बिलीफ (चुकीची मान्यता) आहे म्हणून. गायीच्या अंगाला बघून आकर्षण का होत नाही?! केवळ मान्यताच आहे, बाकी काहीही नाही. मान्यता मोडून टाकली तर काहीच नाही.