________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
29
दादाश्री : हो, हा अप्रतिक्रमणाचा दोष आहे, त्यावेळेस प्रतिक्रमण केले नव्हते, म्हणून आज हे घडले. आता प्रतिक्रमण केल्याने पुन्हा दोष होणार नाही.
प्रश्नकर्ता : कपडे (दोष) धुतले गेले असे केव्हा म्हणता येईल?
दादाश्री : प्रतिक्रमण करतो तेव्हा! आपल्या स्वतःच्याच लक्षात येते की मी धुऊन टाकले.
प्रश्नकर्ता : आत खंत वाटली पाहिजे?
दादाश्री : खंत तर वाटलीच पाहिजे ना? जोपर्यंत ह्या गोष्टींचा अंत येत नाही तोपर्यंत खंत तर वाटलीच पाहिजे. आपल्याला फक्त पहात रहायचे आहे की त्याला खंत वाटते की नाही. आपण आपले काम करायचे, तो त्याचे काम करेल.
प्रश्नकर्ता : हे सर्व खूप चिकट आहे. यात थोडा-थोडा फरक पडत राहिला आहे.
दादाश्री : जसा दोष भरला असेल तसा निघेल. पण ते पाच वर्षांनी किंवा दहा वर्षांनी किंवा बारा वर्षांनी सर्व खाली होऊन जाईल. टाकी वगैरे सर्व स्वच्छ करुन टाकेल. मग स्वच्छ! मग मजा करा!
प्रश्नकर्ता : एकदा बीज पडले म्हणजे ते रुपकमध्ये तर येणारच ना?
दादाश्री : बीज तर पडतेच ना! ते मग रुपकमध्ये तर येईल परंतु जोपर्यंत ते घट्ट होत नाही, तोपर्यंत कमी-जास्त होऊ शकते. म्हणून मरण्या अगोदर ते स्वच्छ होऊ शकते. ___म्हणूनच आम्ही विषयाच्या दोष असलेल्यांना सांगत असतो ना की विषयाचे दोष झाले असतील, अन्य दोष झाले असतील, तर तू रविवारी उपवास कर आणि पूर्ण दिवस त्या दोषांचा पुन्हा पुन्हा विचार करुन त्यांना धुत राहा. असे जर आज्ञापूर्वक केले ना, तर कमी होतात!
प्रश्नकर्ता : विषय-विकारसंबंधी दोषांचे सामायिक-प्रतिक्रमण कशा प्रकारे करावे?