________________
28
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
[6] 'स्वतः' स्वतःला रागवावे! ह्या भावाला पाहा ना, स्वत:ने स्वत:ला चांगलेच खडसावले होते, खूप धमकावले होते, तो रडतही होता आणि स्वत:ला धमकावतही होता. दोन्ही गोष्टी बघण्यासारख्या होत्या.
प्रश्नकर्ता : एके दिवशी दोन-तीन वेळा चंद्रेशला धमकावले होते, तेव्हा तो खूप रडलाही होता. आणि मला असेही सांगत होता की, यापुढे असे होणार नाही, तरी सुद्धा पुन्हा तसे होतच राहते.
दादाश्री : हो. तसे तर होतच राहणार. पण प्रत्येक वेळी त्याला सांगत राहायचे, आपण सांगत राहायचे आणि ते होत राहिल. सांगितल्यामुळे आपले वेगळेपण राहते. त्यात तन्मयाकार होत नाही. शेजारच्या (फाईल नं १) ला रागावतो अशा प्रकारे चालत राहते. असे करत करत पूर्ण होईल. सर्व फाईली पूर्ण होतील! विषयाचा विचार आला तरीही म्हणावे, की 'हे मी नाही, हे वेगळे आहे,' असे वेगळे होऊन त्याला रागवावे लागते.
___ प्रश्नकर्ता : तुम्ही जो आरश्यासमोर सामायिक करण्याचा प्रयोग दाखवता ना, मग प्रकृतिसोबत बातचीत (संवाद) करायचा, हे प्रयोग खूप चांगले वाटतात परंतु ते दोन-तीन दिवस चांगले चालते पण त्यानंतर प्रयत्न मंद पडतात.
दादाश्री : मंद पडले तर पुन्हा नव्याने चालू करायचे. जुने झाले म्हणजे मंद पडतातच. पद्गालाचा स्वभावच असा आहे की जुने झाले म्हणजे ते बिघडू लागते. म्हणून पुन्हा नव्याने त्याची सुरुवात करावी.
प्रश्नकर्ता : अर्थात ह्या प्रयोगाद्वारेच कार्य सिद्ध व्हायला हवे. परंतु तसे होत नाही आणि अर्ध्यातूनच प्रयोग बंद होतो. दादाश्री : असे करता करताच सिद्ध होते, पटकन होत नाही.
[7] पश्चातापासहित प्रतिक्रमण! प्रश्नकर्ता : कधी-कधी तर प्रतिक्रमण करण्याचा कंटाळा येतो. एकावेळी खूप सारे करावे लागतात.