________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
जो चालतो, त्याचे सर्वस्व जाते) समंजस नव्हते का कबीरजी ? आणि हा तर मनाच्या सांगण्यानुसार चालत राहतो. मनाने सांगितले की, 'याच्याशी लग्न कर.' म्ह णून काय खरच लग्न करायचे ?
प्रश्नकर्ता : नाही. असे करु नये.
27
दादाश्री : मन तर अजुन बोलेल. असे बोलेल तेव्हा तुम्ही काय कराल? ब्रह्मचर्य व्रत पाळायचे असेल तर स्ट्रोंग राहावे लागेल. मन तर असेही बोलेल आणि तुम्हालाही तसे बोलण्यास भाग पाडेल. म्हणूनच मी सांगत होतो ना की उद्या सकाळी तुम्ही इथून पळून सुद्धा जाल. याचे कारण? मनाच्या सांगण्याप्रमाणेच चालण्याऱ्यांचा काय भरोसा ?
प्रश्नकर्ता : आता आम्ही इथून कुठेच पळून जाणार नाही.
दादाश्री : अरे, पण मनाच्या सांगण्यानुसार चालणारा माणूस इथून जाणार नाही, याची काय गॅरेंटी ? ? अरे, जर मी तुला दोन दिवस हलवले (रागावले) ना, अरे, थोडेसे जरी हलवले ना, तर परवाच तू इथून निघून जाशील ! हे तर तुला माहितच नाही. तुमच्या मनाचा काय ठिकाणा ?
सध्या तर तुमचे मन तुम्हाला 'लग्न करण्यासारखे नाही, लग्न करण्यात खूप दुःख आहे' असे सांगून तुम्हाला मदत करत आहे. हा सिद्धांत प्रथमतः तुम्हाला तुमच्या मनानेच दाखविलेला आहे. हा सिद्धांत तुम्ही ज्ञानपूर्वक नक्की केलेला नाही, हा तर तुमच्या मनाने नक्की केलेला आहे. 'मनाने' तुम्हाला सिद्धांत दाखविला की 'असे करा. '
प्रश्नकर्ता : ज्ञानपूर्वक निश्चय केला असेल तर, मन त्याचा विरोध करणारच नाही ना ?
दादाश्री : नाही. नाही करणार. ज्ञानपूर्वक निश्चय केला असेल तर त्याचा फाऊंडेशन (पाया) वेगळ्याच प्रकारचा असेल ना! त्याचे सर्व फाऊंडेशन आर.सी.सी. चे असतात. आणि हे तर रोडांचे, आत कोंक्रीट केलेले. म्हणून मग भेगा पडणारच ना ?