________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
25
दादाश्री : निश्चयाने. निश्चय असेल तर बहाणे कसे बनवेल? स्वत:चाच निश्चय असेल तर तो बहाणा बनवणारच नाही ना? 'मांसाहार करायचा नाही' असा ज्याचा निश्चय आहे, तो कधी मांसाहार करतच नाही.
प्रश्नकर्ता : अर्थात प्रत्येक गोष्टीत निश्चय करायचा? दादाश्री : निश्चयानेच सर्व कार्य होते. प्रश्नकर्ता : आत्मा प्राप्त केल्यानंतर निश्चयबळ ठेवावे लागते?
दादाश्री : स्वतः ठेवायचेच नाही ना! आपण तर 'चंद्रेशला' सांगायचे की तुम्ही बरोबर निश्चय करा. ह्या बाबतीत प्रश्न विचारायचे असतील तर तो बहाणे शोधतो. म्हणून असे प्रश्न विचारायचे असेल तेव्हा त्याला म्हणायचे 'चूप' 'गेट आऊट' म्हटले की तो गप्प बसेल. 'गेट आऊट' म्हटल्या बरोबरच सर्व पळतात.
तुझ्या बाबतीत काय घडते?
प्रश्नकर्ता : दिवसभरात असा एविडन्स(संयोग) समोर आला तर, विषयाची एखादी गाठ फुटते, पण लगेच थ्री विझनने पाहतो.
दादाश्री : नदीत जर एकदाच बुडला तर मरुन जाणार ना? की रोज रोज बुडल्यावर मरणार? नदीत तर त्याचवेळी बुडून मरतो, मग काही हरकत आहे? नदीचे काही नुकसान होणार आहे का?
शास्त्रकारांनी तर एकाच वेळेच्या अब्रह्मचर्याला 'मृत्यू' म्हटले आहे. मरुन जा, पण अब्रह्मचर्य होऊ देऊ नकोस.
कर्माचा उदय आला असेल आणि जर जागृती राहत नसेल तेव्हा ज्ञानाची वाक्ये मोठ्याने बोलून जागृती आणतो आणि कर्माच्या विरोधात बसतो, याला 'पराक्रम' म्हणतात. स्व-वीर्याला स्फुरायमान करणे म्हणजे पराक्रम होय. पराक्रमापुढे कोणाचीही हिम्मत नाही.
तू जितका सिन्सियर(निष्ठावान) तेवढी तुझी जागृति. आम्ही तुला हे सूत्ररुपाने देतो आणि लहान मुलगाही समजू शकेल असे स्पष्टपणे