________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
हे दोन्ही जर एकत्र आले तर जबरदस्त कार्य सिद्धी होणारच, पण जर आतला निश्चय जरा सुद्धा डगमगला नाही, तर ! आमची आज्ञा तर तो जिथे जाईल तिथे त्याला मार्ग दाखवेल. परंतु आपण किंचितही प्रतिज्ञा तोडू नये. जर विषयाचा विचार आला तर अर्ध्या तासापर्यंत प्रतिक्रमण करुन धूत रहायचे. की अजूनही हे विचार का येत आहेत! आणि नजर तर कुणाशीही मिळवायचीच नाही. ज्यांना ब्रह्मचर्यच पाळायचे आहे त्यांनी तर नजरेला नजर मिळवूच नये.
24
एखाद्या स्त्री जातीला जर सहजही आपल्या हाताने स्पर्श झाला असेल तर निश्चय डगमगतो. रात्री झोपूच देणार नाही असे हे परमाणू आहेत! म्हणून स्पर्श तर व्हायलाच नको. आणि जर दृष्टी सांभाळली गेली तर निश्चय डगमगत नाही !
प्रश्नकर्ता : एखाद्याचा निश्चय ब्रह्मचर्यासाठी डगमगत असेल तर त्याची पूर्वीची भावना तशी असेल, म्हणून ?
दादाश्री : नाही, असे नाही, हा तर निश्चयच नाही. हा पूर्वीचा प्रोजेक्ट नाही आणि हा जो निश्चय केला आहे, तो तर लोकांचे पाहून केलेला आहे. हे फक्त लोकांचे पाहून अनुकरण केले आहे म्हणून डगमगतो. त्यापेक्षा लग्न करुन घे ना भाऊ, (लग्न केल्याने) काय नुकसान होणार आहे ? एखादीचे लग्न तरी पार पडेल.
ब्रह्मचर्यात अपवाद ठेवू शकू, अशी वस्तु नाही. कारण की माणसाचे मन पोल ( बहाणे) शोधत असते, एखादया ठिकाणी एवढे छोटेसे जरी छिद्र असेल तर मन त्यास मोठे करुन देते !
प्रश्नकर्ता : हा जो पोल शोधून काढतो, त्यात कोणती वृत्ति काम करते ?
दादाश्री : यात मनच काम करते, वृत्ति नाही. मनाचा स्वभावच असा पोल शोधण्याचा आहे.
प्रश्नकर्ता : मन पोल शोधत असेल तर त्याला कशा प्रकारे थांबवायचे ?