________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
समजावून देतो. जो जितका सिन्सियर, तितकी त्याची जागृति. हे तर सायन्स आहे. यात जेवढी सिन्सियारिटी असेल तेवढीच त्याची प्रगती होते, आणि ही सिन्सियारिटी तर थेट मोक्षापर्यंत घेऊन जाते. सिन्सियारिटीचे फळ मोरालिटीत(नैतिकतेत) येते.
प्रश्नकर्ता : त्या दिवशी आपण काही सांगत होता की तारुण्यातही 'रीज पॉइन्ट' असते, तर हे 'रीज पॉइन्ट' म्हणजे काय?
दादाश्री : 'रीज पॉइन्ट' अर्थात हे जे छप्पर असते ना, यात 'रीज पॉइन्ट' कोणत्या ठिकाणी येतो? टोकावर.
तारुण्य जेव्हा 'रीज पॉइन्ट' वर(टोकावर) जाते त्यावेळीच सर्व उध्वस्त करुन टाकते. त्यामधून जर तो 'पास' झाला, त्यात अडकला नाही, तर तो जिंकला. आम्ही तर सर्वकाही सांभाळून घेतो, पण त्याचे स्वतःचेच मन जर बदलत असेल तर त्यावर काही उपाय नाही. म्हणूनच आम्ही आत्ताच, उदयात येण्या अगोदरच त्याला शिकवतो की भाऊ, खाली बघून चल. स्त्रीला बघु नकोस. भजी-जिलेबीकडे सगळीकडे बघु शकतोस. परंतु या बाबतीत तुमची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की आता तारुण्य आहे.
[4] विषय विचार हैराण करतात तेव्हा.... कधीतरी मनात काही खराब विचार आला आणि त्याला काढून टाकण्यात जर थोडा वेळ लागला तर त्याचे मोठे प्रतिक्रमण करावे लागते. इथे तर विचार येताक्षणी, ताबडतोब काढून टाकायचे, उपटून फेकून द्यायचे.
[5] चालू नये, मनाच्या सांगण्याप्रमाणे! मनाच्या सांगण्यानुसार चालूच नये. मनाचे सांगणे जर आपल्या ज्ञानाला अनुसरुन असेल, तर तितके एडजस्ट करुन घ्यावे. आपल्या ज्ञानाच्या विरुद्ध चालत असेल तर बंद करुन द्यावे. पहा ना, चारशे वर्षांपूर्वी कबीर म्हणाले होते, किती समंजस व्यक्ति होते ते! म्हणतात की, 'मनका चलता तन चले, ताका सर्वस्व जाय.' (मनाच्या सांगण्यानुसार