________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रश्नकर्ता : आपण सांगितले की हिशोब आहे, म्हणून आकर्षण होते. तर तो हिशोब आधीच कसा उपटून फेकू शकतो ?
33
दादाश्री : हे तर त्याच क्षणी, ऑन दी मोमेन्ट केले तरच होणार. अगोदर नाही होत. मनात विचार आला की, 'स्त्रीसाठी माझ्या शेजारी जागा ठेवू.' त्यावेळी लगेचच त्या विचाराला उपटून टाकावे, 'हेतू काय आहे' ते पाहून घ्यावे. आपल्या सिद्धांताला पकडून आहे की सिद्धांताच्या विरुद्ध आहे. सिद्धांताच्या विरुद्ध असेल तर लगेचच उपटून फेकून द्यावे.
प्रश्नकर्ता : मला तर स्पर्श करायचाच नाही. पण एखादया मुलीने जर समोरुन स्पर्श केला तर मग मी काय करु?
दादाश्री : बरोबर. सापाने जर मुद्दाम स्पर्श केला तर त्यास आपण काय करु शकतो ? पुरुष किंवा स्त्रीला स्पर्श करणे आवडेलच कसे ? जिथे नुसता दुर्गंधच आहे, तिथे स्पर्श करणे कसे आवडेल ?
प्रश्नकर्ता : पण स्पर्श करतेवेळी यातील काहीच आठवत नाही.
दादाश्री : हो, पण कसे आठवले ? स्पर्श करतेवेळी तर इतके पॉइजन्स(विषारी)असते की मन-बुद्धि - चित्त - अहंकार या सर्वांवर आवरण येऊन जाते. मनुष्य बेभान होऊन जातो, अगदी जनावरा सारखाच होतो तेव्हा !
स्पर्श झाला किंवा असे काही झाले तर मला येऊन सांगायचे, म्हणजे मी त्वरित शुद्ध करुन देईल.
स्त्री किंवा विषयात रममाणता केली, ध्यान केले, निदिध्यासन केले तर त्याच्याने विषयाची गाठ पडते. मग ती गाठ कशी सुटेल ? तेव्हा म्हणे, विषयाच्या विरुद्ध विचार केल्याने ती गाठ सुटते.
दृष्टी बदलली (आकर्षित झाली) की मग रमणता सुरु होते. ही जी दृष्टी बदलते, त्याचे कारण मागील जन्मांचे कॉजेस आहेत पण म्हणून काही सर्वांनाच पाहिल्यावर दृष्टी बदलत नसते. अमुकच व्यक्तिंना पाहिल्यावर दृष्टी बदलते. जर कॉजेस असेल, त्याचा पूर्वीचा हिशोब