________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
काहीही बिघडत नाही. भगवंत कशासाठी केशलोचन करत होते? या केसांमुळे एखादया स्त्रीचा माझ्यावर भाव बिघडला तर? म्हणून हे केसच काढून टाकले तर भाव बिघडणारच नाही. कारण भगवंत तर खूप रुपवान होते, महावीर भगवंतांचे रुप, तर संपूर्ण विश्वात अनुपम होते!
प्रश्नकर्ता : स्त्रीयां वरील मोह आणि राग जर निघून गेला, तर रुची संपत जाते का?
दादाश्री : रुचिची गाठ तर अनंत जन्मांपासून पडलेली आहे, ती केव्हा फुटेल हे सांगता येणार नाही. म्हणून या सत्संगातच पडून राहावे. या संगाबाहेर गेलो की, पुन्हा त्या रुचिच्या आधारे सर्व उगवेल. म्हणून या ब्रह्मचारींच्या संगातच रहावे लागते. अजुन ही रुची गेलेली नाही, म्हणून दुसऱ्या कुसंगात घुसल्या बरोबर लगेच चालू होऊन जाते. कारण की कुसंगाचा स्वभावच असा आहे. परंतु ज्याची रुची उडून गेली असेल तर मग त्याला कुसंग स्पर्शत नाही.
आमची आज्ञा पाळाल तर तुमचा मोह जाईल. तुम्ही स्वतः जर मोहाला काढायला जाल तर तो तुम्हालाच काढून टाकेल असा आहे! म्हणून मोह काढून टाकण्यापेक्षा त्यास सांगावे, ‘बसा साहेब, आम्ही तुमची पुजा करतो!' मग वेगळे होऊन आपण त्यावर उपयोग केंद्रित केला आणि दादांच्या आज्ञेत राहिलो तर मोहाला लगेच स्वतःहून तिथून पळ काढावाच लागेल.
[3] दृढ निश्चय, पोहचवतो पार निश्चय कशास म्हणतात? की वाटेल तसे(विषय विकारांचे) सैन्य आपल्यावर चढाई करायला आले तरी आपण त्यांना वश होणार नाही! आत वाटेल तसे समजावणारे भेटले तरीही आपण त्यांचे ऐकायचे नाही! एकदा निश्चय केल्यावर, मागे वळून पाहत नाही, त्याला खाऱ्या अर्थाने निश्चय म्हणतात.
निश्चय म्हणजे सर्व विचारांना बंद करुन एकाच विचारावर ठाम रहाणे, की आपल्याला इथून स्टेशनला पोहोचायचे आहे, स्टेशनवरुन