________________
20
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
जाते।
नाकाला तर खरोखर आवडते ना? अरे, खूप सुंगध येतो ना? अत्तर लावलेले असते ना? म्हणजे असे पृथक्करण केल्यावर समजते. संपूर्ण नर्कच तिथे पडलेला आहे. परंतु असे पृथक्करण होत नसल्यामुळे लोक गोंधळतात. तिथेच मोह होतो, हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना!
'एक विषयाला जिंकून, जिंकला पूर्ण संसार, राजाला जिंकून जिंकले, दळ पूर व अधिकार.'
-श्रीमंद राजचंद्र फक्त एका राजालाच जिंकले तर त्याचे सैन्य, राज्य आणि अधिकार सर्वच आपल्याला प्राप्त होते.(तसेच एका विषयाला जर जिंकले तर संपूर्ण जग जिंकले असे आहे !
प्रश्नकर्ता : आपल्याकडून ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर आम्ही ह्याच जन्मातच विषय बीजापासून संपूर्ण निग्रंथ होऊ शकतो का?
दादाश्री : सर्वच होऊ शकते. पुढील जन्मासाठी बीज पडणार नाही. ही जी जुनी बीजं आहेत ती तुम्ही धुऊन टाका, आणि नवीन बीज पडत नाही.
प्रश्नकर्ता : अर्थात पुढील जन्मी विषयासंबंधी एकही विचार येणार नाही?
दादाश्री : नाही येणार. थोडेफार कच्चे राहिले असेल तर पूर्वीचे थोडे विचार येतील पण ते विचार फारसे स्पर्शणार नाहीत. जिथे हिशोब नाही, त्याचे जोखिम नाही.
प्रश्नकर्ता : शीलवान कोणाला म्हणतात?
दादाश्री : विषयाचा विचार येत नाही, क्रोध-मान-माया-लोभ होत नाही, त्याला शीलवान म्हणतात.
कसोटीचे जर कधी प्रसंग आले, तर त्यासाठी दोन-तीन उपवास करा. जेव्हा (विषयाच्या) कर्माचा जोर खूप वाढतो तेव्हा उपवास केल्यावर ते बंद होते. उपवास केल्याने मरत नाही.