________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
भावनिद्रा येते की नाही? भावनिद्रा आली तर जग तुला चिकटले. जर भावनिद्रा आली, तर त्याच व्यक्तिच्या शुद्धात्म्याजवळ ब्रह्मचर्यासाठी शक्ति मागवी की, 'हे शुद्धात्मा भगवान, मला संपूर्ण जगासोबत ब्रह्मचर्य पालन करण्याची शक्ति द्या.' आमच्याजवळ जर शक्ति मागितली तर उत्तमच आहे, परंतु ज्या व्यक्तिसोबत व्यवहार झाला आहे तिथेच डायरेक्ट माफी मागणे हे अति उत्तम आहे.
प्रश्नकर्ता : नजरेस नजर मिळाली तर काय करायचे?
दादाश्री : आपल्या जवळ जे प्रतिक्रमणाचे साधन आहे, त्याने घुऊन टाकायचे. नजर मिळाली तर लगेचच प्रतिक्रमण केलेले उत्तम. म्हणून तर म्हटले आहे ना की सुंदर स्त्रीचा फोटो किंवा मूर्ति ठेवू नका.
प्रश्नकर्ता : विषयात सर्वात जास्त गोडवा मानला गेला आहे, ते कोणत्या आधारावर मानला गेला आहे?
दादाश्री : त्यात त्याला गोडवा वाटला आणि इतर ठिकाणी त्याने गोडवा पाहिलेलाच नाही, म्हणूनच त्याला विषयात खूप गोडी वाटते. खरे बघायला गेलो तर सर्वात जास्त घाण इथेच आहे, पण इथे गोडी वाटत असल्यामुळे त्याला भान रहात नाही.
प्रश्नकर्ता : अजिबात आवडत नाही, तरीही आकर्षण होत असते त्याची खूप खंत वाटते.
दादाश्री : जर खंत वाटत असेल तर विषय निघून जातो. केवळ एक आत्माच पाहिजे. तर मग विषय कसा उभा होईल? दुसरे काही पाहिजे असेल, तर विषय उभा होईल ना? तुला विषयाचे पृथक्करण करता येते का?
प्रश्नकर्ता : आपण सांगा?
दादाश्री : पृथक्करण म्हणजे काय की, विषय हे डोळ्यांना आवडेल असे असते का? कानाने ऐकायला आवडते का? आणि जीभेने चाटले तर गोड लागते का? एकाही इन्द्रियाला आवडत नाही. या