________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मागत असेल, ही फार उत्तम गोष्ट आहे. ब्रह्मचर्याची शक्ति सतत मागत राहिल्याने कोणाला दोन वर्षांनी, तर कोणाला पाच वर्षांनी ब्रह्मचर्य उदयात येते. ज्याने अब्रह्मचर्य जिंकले त्याने संपूर्ण जग जिंकले, ब्रह्मचर्य पाळणाऱ्यांवर तर शासनदेव - देवी खूप प्रसन्न असतात.
18
सावध राहण्यासारखे तर विषयाच्या बाबतीत आहे. एक विषय तेवढे जिंकले तरी पुष्कळ झाले. त्याचा विचार येण्या अगोदरच त्याला उपटून टाकावे लागते. आत विचार आला की लगेच उपटून टाकावे. दुसरी गोष्ट, एखाद्या सोबत सहजही दृष्टीस दृष्टी मिळाली तर, दृष्टी लगेचच बाजूला करावी लागते. नाहीतर ते रोपटे थोडेसे जरी वाढले तर त्यातून पुन्हा बी पडते. म्हणूनच त्या रोपट्याला उगवतानाच उपटून टाकावे लागते.
ज्याच्या संगतीत राहून आपण फसले जाऊ असे असेल तर त्यापासून खूपच दूर राहायला हवे, नाहीतर एकदा जर फसलो तर पुन्हा पुन्हा फसतच राहतो, म्हणून तिथून पळ काढावा. घसरुन पडण्यासारखी जागा असेल तिथून पळ काढावा, म्हणजे मग आपण घसरणार नाही. सत्संगात इतर ‘फाईली' तर भेटत नाहीत ना? एक समान विचारवालेच सर्व भेटतात ना ?
मनात थोडासा जरी विषयाचा विचार आला की ताबडतोब त्याला उपटून फेकून दिले पाहिजे. आणि जर कुठे आकर्षण झाले तर त्याचे लगेचच प्रतिक्रमण केले पाहिजे. या दोन शब्दांना ज्याने पकडले त्याला कायम ब्रह्मचर्य राहणार. या बियांचा स्वभाव कसा आहे की त्या पडतच राहतात. डोळे तर निरनिराळे पाहत राहतात. त्यामुळे आत बी पडते. म्हणून मग त्याला उपटून टाकावे. जोपर्यंत बी रुपाने आहे तोपर्यंत उपाय आहे, नंतर काही होऊ शकत नाही.
सर्व स्त्रिया काही आपल्याला आकर्षित करीत नाहीत. ज्या आकर्षित करतात तो तुमचा मागील जन्माचा हिशोब आहे; म्हणून तिथे उपटून फेकून द्या, स्वच्छ करुन टाका. आपल्या ज्ञानानंतर काही अडचण येत नाही. फक्त एका विषयाच्या बाबतीत आम्ही सावध करतो. दृष्टी मिळवणे हाच गुन्हा आहे, आणि हे समजल्यानंतर जबाबदारी खूप वाढते, म्हणून कोणासोबतही दृष्टी मिळवायची नाही.