________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
तोपर्यंत वीर्याचे उर्ध्वगमन होतच नाही. आपल्या इथे तर आता सरळ आत्मपक्षातच टाकून द्यायचे आहे, त्याचेच नाव उर्ध्वगमन आहे ! विषय बंद केल्याने त्याला आत्मसुखाचा अनुभव होतो. आणि विषय बंद झाला म्हणजे वीर्याचे उर्ध्वगमन होईलच. आमची आज्ञाच अशी आहे की विषय बंद होऊन जातो.
प्रश्नकर्ता : आज्ञेत काय असते ? व्यक्ति बंद करायचे ?
मन
दादाश्री : व्यक्ति विषय बंद करा असे आम्ही सांगतच नाही. -बुद्धि- चित्त आणि अहंकार ब्रह्मचर्यात राहतील असे असायला हवे. आणि मन-बुद्धि-चित्त आणि अहंकार ब्रह्मचर्याच्या पक्षात आले म्हणजे मग स्थूळ तर आपोआपच येईलच. तुझ्या मन-बुद्धि- चित्त आणि अहंकाराला फिरव. आमची आज्ञा अशी आहे की हे चारही फिरुनच जातात !
16
प्रश्नकर्ता : हे वचनबळ ज्ञानींना कसे प्राप्त झाले असेल ?
दादाश्री : स्वतः निर्विषयी असतील तरच वचनबळ प्राप्त होते, अन्यथा विषयाचे विरेचन करवू शकेल असे वचनबळ असतच नाही ना! मन-वचन-कायेने संपूर्णपणे निर्विषयी असतील तेव्हा त्यांच्या शब्दाने विषयाचे विरेचन होते.
खंड : 2
'लग्न करायचेच नाही' असा निश्चय करणाऱ्यांसाठी मार्ग [1] विषयापासून कोणत्या समजमुळे सुटू शकतो ?
प्रश्नकर्ता : माझी लग्न करण्याची इच्छा नाही, परंतु आई - वडील तसेच इतर नातेवाईक लग्नासाठी दबाव टाकत आहेत. तर मी लग्न करावे की नाही ?
दादाश्री : तुम्हाला जर लग्न करण्याची इच्छाच नसेल तर आपले हे 'ज्ञान' तुम्ही घेतलेले आहे म्हणून तुम्हाला ते जमेल. या ज्ञानाच्या प्रतापाने सर्वकाही शक्य होईल असे आहे. मी तुम्हाला समजावेल की कशाप्रकारे वागावे आणि त्यात जर तुम्ही पार उतरले, तर अति उत्तम. तुमचे कल्याण होईल ! ! !