________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
हे (विषय) मला नकोच. तेव्हा मग आम्ही त्याला आज्ञा देतो आणि आमचे वचनबळ काम करते. म्हणून त्याचे चित्त मग इतरत्र कुठेही जात नाही.
15
4
हे ब्रह्मचर्य जर कोणी पाळले आणि जर शेवटपर्यंत यातून पार उतरला तर ब्रह्मचर्य ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. हे 'दादाई ज्ञान', 'अक्रम विज्ञान' आणि त्यासोबत ब्रह्मचर्य, हे सर्व असेल, तर त्याला आणखी काय हवे? एक तर हे 'अक्रम विज्ञान'च असे आहे की जर कधी हा अनुभव, विशेष परिणाम प्राप्त करु शकला, तर तो राजांचाही राजा आहे. संपूर्ण जगाच्या राजांना पण तिथे नमस्कार करावा लागेल!
प्रश्नकर्ता : आता तर शेजारी सुद्धा नमस्कार करत नाही !
प्रश्नकर्ता : समजल्यानंतर सुद्धा संसारातील विषयांमध्ये मन आकर्षित होत राहते. खरे-खोटे काय आहे हे सर्व समजतो, तरीही विषयांमधून सुटू शकत नाही. तर त्यावर उपाय काय ?
दादाश्री : जी समज क्रियाकारी असते तीच खरी समज म्हटली जाते. इतर सर्व वांझ समज म्हटली जाते.
प्रश्नकर्ता : ही समज क्रियाकारी होण्यासाठी, काय प्रयत्न करावा?
दादाश्री : मी तुम्हाला सविस्तर समजावतो. मग ती समजच क्रिया करीत राहील. तुम्ही काहीच करायचे नाही. तुम्ही ढवळाढवळ करायला जाल तर ते उलट जास्त बिघडेल. जे ज्ञान, जी समज क्रियाकारी असेल, तीच खरी समज आणि तेच खरे ज्ञान आहे.
या जगात जर कुठल्या गोष्टीचीं निंदा करण्यासारखी असेल तर ते अब्रह्मचर्य आहे. इतर सर्व गोष्टी इतक्या निंदा करण्यासारख्या नाहीत.
प्रश्नकर्ता : परंतु मानसशास्त्री तर असे सांगतात की, विषय बंद होऊ शकतच नाही, शेवटपर्यंत राहतो. त्यामुळे मग वीर्याचे उर्ध्वगमन होणारच नाही ना ?
दादाश्री : मी काय म्हणतो की, विषयाचा अभिप्राय बदलला की विषय राहतच नाही! जोपर्यंत ( विषयसंबंधी) अभिप्राय बदलत नाही