________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
13
दूर राहिलो तर मनुष्य त्या वस्तुला विसरुनच जातो. म्हणजेच मनाचा स्वभाव कसा आहे? दूर राहिले तर विसरुन जाते. जवळ आल्यावर पुन्हा ओढाताण सुरु होते. मनाचा परिचय तुटला. 'आपण' वेगळे राहिलो म्हणून मन सुद्धा त्या वस्तुपासून दूर राहिले, म्हणून मग ते कायमसाठी विसरते. त्याला आठवणही येत नाही. नंतर आपण सांगितले तरी ते त्या बाजूला वळत नाही. हे तुम्हाला समजतय का? तू जर तुझ्या मित्रापासून दोन वर्षांसाठी दूर राहिला, तर तुझे मन त्याला विसरुन जाईल.
प्रश्नकर्ता : जेव्हा आपण मनाला विषय भोगण्यासाठी सुट देत असतो, तेव्हा त्यात ते नीरस राहते, आणि जेव्हा विषय भोगण्याकडे कंट्रोल करतो, तेव्हा ते जास्त उसळते, आकर्षित होते, तर त्याचे काय कारण?
दादाश्री : असे आहे की, याला आपण मनाचा कंट्रोल म्हणू शकत नाही. जो आपला कंट्रोल स्वीकारत नसेल तर तो कंट्रोलच नाही. कंट्रोलर असायला हवा ना? स्वतः कंट्रोलर असेल तर कंट्रोल स्वीकारेल. स्वतः कंट्रोलर नाही म्हणून मन ऐकत नाही, मन तुमचे ऐकत नाही
ना?
मनाला थांबवायचे नाही. मनाच्या कारणांना नियंत्रित करायचे आहे. मन तर स्वतःच एक परिणाम आहे. तो परिणाम दाखवल्याशिवाय राहणार नाही, परिक्षाचा परिणाम आहे, परिणाम बदलू शकत नाही, परीक्षेला बदलायचे आहे. ज्याच्याने हे परिणाम उभे राहतात त्या कारणांना बंद करायचे आहे. मग ही कारणे कशी शोधायची? मन कशामुळे उत्पन्न झाले? तेव्हा म्हणे, विषयात चिकटलेले आहे. 'कुठे चिकटलेले आहे? हे शोधून काढायला हवे. आणि मग तिथे कापायचे.
प्रश्नकर्ता : वासना सोडण्यासाठी सर्वात सोपा उपाय कोणता?
दादाश्री : 'माझ्याजवळ या.' हाच उपाय. दुसरा काय उपाय? वासना जर तुम्ही स्वतः सोडायला जाल तर दुसरी वासना घुसेल. कारण अवकाश (पोकळी) तसे राहत नाही. तुम्ही एक वासना सोडली म्हणून तिथे अवकाश निर्माण होईल. आणि मग तिथे दुसरी वासना घुसेल.