________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
टाळे लावा किंवा वाटेल ते उपाय करा त्याने काहीच होऊ शकणार नाही. कामवासना नको असेल तर आम्ही त्यासाठी मार्ग दाखऊ.
__ प्रश्नकर्ता : विषयांपासून परावृत्त होण्यासाठी ज्ञान ही महत्वाची वस्तु आहे.
दादाश्री : सर्व विषयांतून सुटण्यासाठी ज्ञान हे एकच अति आवश्यक आहे. अज्ञानतेमुळेच सर्व विषय चिकटलेले आहेत. म्हणून वाटेल तेवढे टाळे लावले तरी त्याच्याने विषय काही बंद होणार नाही. इन्द्रियांना टाळा लावणाऱ्यांना मी पाहिले आहे. पण तसे केल्याने विषय काही बंद होत नाही.
ज्ञानाने सर्व (दोष) निघून जातात. ज्ञानामुळे आपल्या या सर्व ब्रह्मचारींना विषयसंबंधित एक विचार सुद्धा येत नाही, ज्ञानाच्या प्रभावाने.
प्रश्नकर्ता : सायकोलॉजी असे सांगते की, एकदा जर तुम्ही पोटभर आईस्क्रीम खाल्ले. तर त्यानंतर तुम्हाला खायचे मनच होणार नाही.
दादाश्री : जगात असे होऊच शकत नाही. असे पोटभर खाल्ल्याने तर पुन्हा खायचे मन होणारच. पण जर तुम्हाला खायचे नसेल आणि जबरदस्तीने सारखे सारखे खाऊ घातले, ठासून ठासून खायला घातले तेव्हा मग उल्ट्या होतात आणि तेव्हा खायचे बंद होईल. पोटभर खाल्ल्याने तर उलट पुन्हा खाण्याची इच्छा होते. या विषयाच्या बाबतीत तर नेहमी जस-जसे विषय भोगत जातो, तस-तसे ते आणखी पेट घेत जाते.
विषय न भोगल्यामुळे थोडे दिवस त्रास होतो, कदाचित महीने, दोन महीने. परंतु त्यानंतर अपरिचयामुळे मनुष्य (विषय) पूर्णपणे विसरुनच जातो. आणि भोगणारा मनुष्य वासना काढू शकतो ह्या गोष्टीत तथ्य नाही. म्हणूनच आपल्या लोकांचा, शास्त्रांचा शोध आहे की हा ब्रह्मचर्याचा मार्गच उत्तम आहे. अर्थात सर्वात मोठा उपाय, म्हणजे अपरिचय!
एकदा जर त्या वस्तूपासून दूर राहिलो, वर्षभर किंवा दोन वर्षांसाठी