________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
त्याचे बीज पडते. हे बीज दोन दिवस राहिले मग तर मारुनच टाकते. पुन्हा उगवते, अर्थात विचार उगताच मूळासकट उपटून फेकून द्यावे. आणि कोणत्याही स्त्री बरोबर दृष्टी मिळवू नये. दृष्टी आकर्षिली जात असेल तर बाजूला करावी आणि दादाजींना आठवून माफी मागावी. या विषयाची आराधना करण्यासारखी नाहीच, असा भाव निरंतर राहिला तर शेत साफ होते. आताही जर कोणी आमच्या सानिध्यात राहिला तर त्याचे सर्व पूर्ण होईल.
ज्याला ब्रह्मचर्यच पाळायचे असेल, त्याने तर संयमाला अनेक प्रकारे तपासून घेतले पाहिजे, परीक्षा करुन पहायला हवी, आणि जर घसरुन पडू असे वाटत असेल तर मग लग्न केलेले उत्तम. पण तेही संयमपूर्वक असायला हवे, जिच्याशी लग्न करायचे असेल तिला सांगून द्यावे की, मला असे संयमपूर्वक रहायचे आहे.
__[2] विकारांपासून विमुक्तीची वाट...
प्रश्नकर्ता : ‘अक्रम मार्गात' विकारांना दूर करण्याचे साधन कोणते?
दादाश्री : इथे विकारांना दूर करायचे नाही. हा मार्ग वेगळा आहे. कित्येक लोकं इथे मन-वचन-कायाचे ब्रह्मचर्य घेतात, आणि कित्येक पत्नीवाले (विवाहीत) आहेत, त्यांना आम्ही मार्ग दाखविला आहे त्याप्रमाणे ते समाधान आणतात. मुळात 'इथे' विकारी पदच नाही, पदच 'इथे' निर्विकारी आहे! विषय हे विष आहे परंतु अगदीच विष नाही. विषयात असलेला नीडरपणा (निर्भयपणा) हे विष आहे. विषय तर लाचारीमुळे, म्हणजे जर कोणी चार दिवसाचा उपाशी असेल आणि पोलिसवाल्याने पकडून त्याला मांसाहार करायला भाग पाडले आणि त्यामुळे त्याला मांसाहार करावा लागला तर त्यास हरकत नाही. स्वत:च्या स्वतंत्र मर्जीनुसार नसावे. पोलिसवाल्याने पकडून जेलमध्ये बसवले तर तिथे बसावेच लागेल ना तुम्हाला? तिथे काही दुसरा उपाय आहे ? म्हणजे कर्म त्याला पकडतो आणि कर्मच त्याला पछाडतो. त्यात आपण नाही म्हणू शकत नाही ना! बाकी जिथे विषयाची गोष्ट येते, तिथे धर्म