________________
14
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
प्रश्नकर्ता : हे क्रोध-मान-माया-लोभ हे जे तुम्ही सांगितले ना, तर हा विषय कशात येतो? 'काम' कशात येते?
प्रश्नकर्ता : विषय वेगळे आहेत आणि हे कषाय वेगळे आहेत. जर आपण विषयांची मर्यादा ओलांडली, मर्यादेपेक्षा जास्त मागितले, ते लोभ आहे.
[3] माहात्म्य ब्रह्मचर्येचे! प्रश्नकर्ता : जो बाल ब्रह्मचर्यचारी असतो तो जास्त उत्तम म्हटला जातो की जो लग्नानंतर ब्रह्मचर्य पाळतो तो जास्त उत्तम म्हटला जातो?
दादाश्री : बाल ब्रह्मचारीची तर गोष्टच वेगळी ना! परंतु आजचे बाल ब्रह्मचारी कसे असतात? हा काळ खराब आहे. त्यांच्या जीवनात आतापर्यंत जे घडले आहे ते जर तुम्ही वाचाल तर लगेचच तुमचे डोके दुखू लागेल.
तुम्हाला जर ब्रह्मचर्य पाळायचे असेल तर तुम्हाला उपाय सांगतो. तो उपाय तुम्ही केला पाहिजे. नाहीतर तुम्ही ब्रह्मचर्य पाळलेच पाहिजे असे काही अनिवार्य नाही. हे तर आत ज्याच्या कर्माचा उदय असेल त्याच्याकडून पाळले जाते. ब्रह्मचर्य व्रत घेणे हे तर त्यांच्या पूर्वकर्माचा उदय असेल तर पाळले जाऊ शकते. पूर्वी भावना केली असेल तर पाळले जाईल. किंवा मग तुम्ही पालन करण्याचा निश्चय केला तर पाळले जाईल. आम्ही काय सांगतो की, तुमचा पक्का निश्चय पाहिजे आणि सोबत आमचे वचनबळ आहे, त्यामुळे ब्रह्मचर्य पाळणे शक्य आहे.
प्रश्नकर्ता : देहासोबत जी कर्म चार्ज होऊन आलेली असतील त्यात बदल तर होऊ शकत नाही ना?
दादाश्री : नाही, काहीच बदल होत नाही. तरीही विषय ही अशी वस्तु आहे की ज्ञानी पुरुषाच्या आज्ञेमुळे फक्त यात मात्र बदल घडू शकतो. पण तरीही हे व्रत सर्वांनाच देता येत नाही. आम्ही अमुकच माणसांना हे व्रत दिले आहे. ज्ञानींच्या आज्ञेने सर्व काही बदलू शकते. समोरच्याला फक्त निश्चयच करायचा आहे की वाटेल ते होऊ दे, परंतु