________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
गाडीतच बसायचे आहे. आपल्याला बसमधून जायचे नाहीच. असा जर तुमचा निश्चय पक्का असेल तर मग गाडीचे सर्व संयोग जूळन येतात. निश्चय कच्चा असेल तर गाडीचे संयोग मिळत नाहीत.
23
प्रश्नकर्ता : निश्चयापुढे टाइमींग बदलून जातो का ?
दादाश्री : निश्चयापुढे सर्व टाइमींग बदलून जातात. हे भाऊ सांगत होते की 'शक्यतो मी तेथे पोहोचेल, पण जर नाही येऊ शकलो तर तुम्ही निघून जा.' तेव्हा आम्ही समजून गेलो की यांचा निश्चय कच्चा आहे. म्हणून मग तिथे एविडन्स ( संयोग) असे जमतात की ज्यामुळे आपल्या धारणेनुसार होत नाही.
प्रश्नकर्ता : आपल्या निश्चयाला तोडतो कोण ?
दादाश्री : आपलाच अहंकार. मोहवाला अहंकार आहे ना ! मूर्च्छित अहंकार !
प्रश्नकर्ता: दानत चोर (खोटी) असणे ही निश्चयाची कमतरता म्हटली जाईल ना ?
दादाश्री : कमतरता नाही, याला तर निश्चय म्हणता येणार नाही. कमतरता असली तर निघून जाते सर्व, पण तो तर निश्चयच नाही. प्रश्नकर्ता : दानत चोर नसेल तर विचार येणे पूर्णपणे बंद होऊन जातात का ?
दादाश्री : नाही, विचारांना येऊ द्या. विचार आले तर त्यात आपल्याला काय हरकत आहे ? विचार येणे बंद होत नाहीत. फक्त आपली दानत मात्र खोटी नसावी. आत कोणत्याही प्रकारची लालच असली तरी तिच्या कचाट्यात सापडत नाही. असे स्ट्रोंग ! विचार येतीलच कसे? विहीरीत पडायचेच नाही असा ज्याचा निश्चय असेल, तो जरी चार दिवसांपासून झोपला नसेल आणि त्याला विहीरीच्या कडेवर बसवले तरी तो तिथे झोपणार नाही.
तुमचा संपूर्ण ब्रह्मचर्य पाळण्याचा निश्चय आणि आमची आज्ञा,