________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
21
[2] दृष्टी उपटली जाते 'थ्री विजनने' !
मी जो प्रयोग केला होता, तोच प्रयोग तुम्ही वापरायचा. आम्ही त्याच प्रयोगाचा निरंतर वापर करत असतो. आम्हाला तर ज्ञान होण्यापूर्वी सुद्धा जागृति रहात होती. कितीही सुंदर कपडे घातले असतील, दोन हजारांची साडी घातली असेल तरीही पाहताक्षणीच जागृती येत असे, त्यामुळे नेकेड (नग्न) दिसत असे. मग दुसरी जागृती उत्पन्न व्हायची, तेव्हा कातडी शिवायचे दिसते आणि तिसऱ्या जागृतीने पोट कापल्यावर आतील आतडे तसेच आतड्यांमध्ये काय काय बदल होत आहे हे सर्व दिसायचे. रक्तांच्या नसा आत दिसायच्या, संडास दिसायचे, अशाप्रकारे आतील सर्व घाण दिसायची. त्यामुळे मग विषय विकार उत्पन्न होणारच नाही ना! यात आत्मा शुद्ध वस्तु आहे, तिथे जाऊन आमची दृष्टी स्थिरावते. मग मोह कसा होईल ?
श्रीमंद् राजचंद्रांनी सांगितले आहे की, 'देखत भूली टळे' म्हणजेच ‘पाहिल्याबरोबर होणारी चूक' टळली तर सर्व दुःखांचा क्षय होतो. शास्त्रांत आपण वाचतो की स्त्रीवर राग ( मोह) करु नका, परंतु स्त्रीला पाहिल्याबरोबरच हे विसरुन जातो, त्यास 'पाहताक्षणी होणारी चूक' असे म्हणतात.
'पाहताक्षणी होणारी चूक टळली' याचा अर्थ काय, तर ही मिथ्या दृष्टी आहे, ती दृष्टी परिवर्तित होऊन सम्यक् दृष्टी झाली तर सर्व दुःखांचा क्षय होतो. मग ती चूक पुन्हा घडू देणार नाही, दृष्टी खेचली जात नाही.
प्रश्नकर्ता : एखाद्या स्त्रीला पाहून पुरुषाला खराब भाव झाले, तर त्यात त्या स्त्रीचा दोष आहे का ?
दादाश्री : नाही, त्यात त्या स्त्रीचा काही दोष नाही ! भगवान महावीरांचे लावण्य पाहून पुष्कळ स्त्रियांना मोह उत्पन्न होत होता, पण त्यामुळे भगवंताला काही स्पर्शत नव्हते ! अर्थात ज्ञान काय म्हणते की तुमची क्रिया सहेतु असली पाहिजे. तुम्ही अशी केशरचना नाही केली पाहिजे किंवा असे कपडे सुद्धा नाही घातले पाहिजेत की ज्यामुळे समोरच्या व्यक्तिला मोह उत्पन्न होईल. आपला भाव शुद्ध असेल तर