________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
17
ब्रह्मचर्य व्रत घेण्याचा विचार आला आणि जर त्याचा निश्चय पक्का झाला तर त्यासारखी मोठी गोष्ट काय असेल? तो तर सर्व शास्त्रं समजून गेला! ज्याने निश्चय केला की आता मला सुटायचेच आहे, त्याला सर्व शास्त्रं समजली. विषयाचा मोह असा आहे की निर्मोहीला सुद्धा तो मोही बनवतो. अरे, साधु-आचार्यांना सुद्धा तो विचलित करुन टाकतो!
प्रश्नकर्ता : ब्रह्मचर्याचा निश्चय केला आहे, त्याला आणखी मजबूत करण्यासाठी काय करायला हवे?
दादाश्री : पुन्हा-पुन्हा निश्चय करायचा आणि 'हे दादा भगवान! मी निश्चय मजबूत करतो, मला निश्चय मजबूत करण्यासाठी शक्ति द्या.' असे बोलल्याने शक्ति वाढते.
प्रश्नकर्ता : विषयाचे विचार आले तरीही त्यास पहात राहायचे?
दादाश्री : विचारांना पहातच राहायचे. नाहीतर काय त्यांना साठवून ठेवायचे?
प्रश्नकर्ता : उडवून नाही का टाकायचे?
दादाश्री : पहातच राहायचे, पाहिल्यानंतर आपण चंद्रेशला सांगायचे की यांचे प्रतिक्रमण कर. मन-वचन-कायेने विषय विकारी दोष इच्छा, चेष्टा-चाळे, हे सर्व जे दोष झाले असतील, त्यांचे प्रतिक्रमण करावे लागते. विषयाचे विचार येतात परंतु स्वतः त्यांच्यापासून वेगळा राहतो, त्यावेळी किती आनंद होतो?! जर विषयातून कायमचा सूटला तर किती आनंद होईल?
मोक्षाला जाण्याचे चार आधारस्तंभ आहेत. ज्ञान-दर्शन-चारित्र्य आणि तप. आता तप केव्हा करावे लागते? मनात विषयाचे विचार येत असतील आणि स्वतःचा दृढ निश्चय असेल की मला विषय भोगायचाच नाही. तर याला भगवंतांनी तप म्हटले आहे. स्वत:ची किंचितमात्र इच्छा नसेल, तरीही विचार येत असतील तिथे तप करायचे आहे.
अब्रह्मचर्याचे विचार येत असतील, परंतु सतत ब्रह्मचर्याची शक्ति