________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मी तुम्हाला दिले ते तर अक्रम असल्यामुळे चालते. दुसऱ्या ठिकाणी तर असे चालत नाही, क्रमिक मार्गात तर पुद्गलसार पाहिजेच, नाहीतर काही लक्षातही राहत नाही. वाणी बोलताना अडखडते.
प्रश्नकर्ता : म्हणजे या दोघांचा काही निमित्त नैमित्तिक संबंध आहे का?
दादाश्री : आहे ना! नाही कसा? तीच तर मुख्य वस्तु आहे! ब्रह्मचर्य असेल तर तुमच्या धारणेनुसार काम होते. धारणेनुसार व्रतनियम सर्व पाळू शकतो. पुढे जाऊ शकतो आणि प्रगतीही होऊ शकते. पुद्गलसार तर खूप मोठी गोष्ट आहे. एकीकडे जर पुद्गलसार असेल तरच समयसार काढू शकतो!
लोकांना अशी खरी समज कोणीही दिली नाही ना! कारण की, लोकं स्वतःच पोलवाले(ध्येया विरुद्ध मनाचे ऐकून ते कार्य न करणे) आहेत. पूर्वीचे ऋषिमुनी तर शुद्ध होते. म्हणून ते योग्य समज देत होते.
विषयाला विष जाणलेच नाही. विष समजणारा त्याला स्पर्श करणारच नाही ना! म्हणूनच भगवंतांने म्हटले आहे की, ज्ञानाचे फळ विरति(थांबणे) ! जाणल्याचे फळ काय? की तो तिथे थांबतो. विषय वासनेचे जोखिम जाणले नाही. म्हणून तिथे तो थांबलाच नाही.
भीती बाळगण्यासारखी असेल तर, या विषय विकाराची भीती बाळगण्यासारखी आहे. या जगात भीती बाळगण्यासारखी दुसरी कोणतीही जागा नाही. म्हणून विषयापासून सावध रहा. ह्या साप, विंचू, वाघापासून सावध नाही का रहात?
अनंत जन्मांच्या कमाईमुळे उच्च गोत्रात, उच्च कुळात जन्म होतो पण नंतर लक्ष्मी आणि विषयामागे अनंत जन्मांची कमाई गमावून बसतो!!!
कित्येक लोकं मला असे विचारतात की, 'ह्या विषयात असे काय आहे की विषयसुख चाखल्यानंतर मी मरणतुल्य होऊन जातो, माझे मन मरुन जाते, वाणी मरुन जाते?' मी म्हटले की, हे सगळे