________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
विषय आहेत. अर्थात ह्या जगात जे डोळ्यांनी दिसते ते सर्वच विषय नाहीत. तुम्ही जर त्यात लुब्धमान झालात तरच त्यास विषय म्हटले जाते. आम्हांला कोणताही विषय स्पर्शत नाही.
हा कोळी जाळे विणतो, मग स्वतः त्यात फसतो. याचप्रमाणे संसाररुपी जाळे स्वतःच विणलेले आहे. मागील जन्मी स्वतः मागणी केली होती. बुद्धीच्या आशयात आपण टेंडर भरला होता की, एक स्त्री तर हवीच. दोन-तीन रुम असावेत, एखादा मुलगा आणि एखादी मुलगी, नोकरी एवढेच पाहिजे. त्या बदल्यात बायको तर मिळालीच मिळाली, पण सासू-सासरे, मेहुणा-मेहुणी, मावस सासू, चुलत सासू, आते सासू, मामे सासू,... किती फसवा फसवी !!! एवढी सारी झंझट सोबत येईल असे माहित असते तर ही मागणीच केली नसती कधी! आपण तर टेंडर भरले होते फक्त एका बायकोचे, मग हे सर्व कशासाठी दिले? तेव्हा निसर्ग म्हणतो, 'भाऊ, तिला एकटीला देऊ शकत नाही. मामे सास, आते सास हे सर्व सोबत दयावे लागते त्याशिवाय तुम्हाला करमणार नाही. सर्व पलटन सोबत असेल तेव्हाच खरी मजा येते !'
आता तुला संसारात काय-काय पाहिजे? ते सांग ना! प्रश्नकर्ता : मला तर लग्नच करायचे नाही.
दादाश्री : हा देहच किती त्रासदायक आहे ना? पोट दुखते तेव्हा ह्या शरीराला कसे होते? मग जर दुसऱ्यांच्या दुकानापर्यंत व्यापार वाढवला(लग्न केले) तर काय होईल? किती त्रास वाढेल. आणि पुन्हा दोन-चार मुले होतील. बायको एकटी असेल तर ठीक आहे, ती नीट राहील परंतु ही चार मुले! मग काय होईल? उपाधीचा अंतच नाही!
योनीमधून जन्म घेतो. तेव्हा योनित किती भयंकर दुःखात राहावे लागते आणि जेव्हा मोठा होतो तेव्हा पुन्हा योनिकडेच वळतो. या जगाचा व्यवहारच असा आहे. कोणीही खरे शिकवलेच नाही ना! आई-वडील सुद्धा सांगतात की लग्न करा आता. आणि हे आई-वडिलांचे कर्तव्यही आहे ना? पण कोणीही खरा सल्ला देत नाही की यात असे दुःख आहे.