________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
मेलेलेच आहेत, पण तुम्हाला त्याचे भान रहात नाही आणि पुन्हा तीच अवस्था उत्पन्न होते. नाहीतर ब्रह्मचर्य जर कधी जपले गेले तर एकेका मनुष्यात तर पुष्कळ शक्ति आहे! आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे यास समयसार म्हटले जाते. आत्म्याचे ज्ञान प्राप्त केले आणि त्याच बरोबर जागृतीही राहिली, तर समयसार उत्पन्न झाले. आणि ब्रह्मचर्य हे पुद्गलसार आहे.
मन-वचन-कायेने जर ब्रह्मचर्य पाळले तर किती छान मनोबळ राहते, वचनबळ किती चांगले राहते आणि किती छान देहबळ राहते. आपल्या इथे भगवान महावीरांच्या काळापर्यंत कसा व्यवहार होता? तर एक-दोन मुले होईपर्यंत 'व्यवहार' (विषयाचा) ठेवत होते. परंतु आजच्या ह्या काळात हा व्यवहार बिघडणार आहे हे त्यांना माहीत होते, म्हणूनच त्यांना पाचवे महाव्रत (ब्रह्मचर्याचे) ठेवावे लागले.
मनुष्य असूनही या पाच इन्द्रियांच्या चिखलात का पडला आहे, हेच मोठे आश्चर्य आहे! भयंकर चिखल आहे हा तर! पण हे न समजल्यामुळे बेशुद्धावस्थेत जगाचा व्यवहार चालू राहतो, थोडासा जरी विचार केला तरीही चिखलाला समजू शकेल. परंतु ही लोकं विचारच करत नाही ना?! नुसता चिखलच आहे. तरीही मनुष्य चिखलात का पडलेला आहे? तर म्हणे, त्याला 'दुसरी स्वच्छ जागा मिळत नाही म्हणून तो अशा चिखलात लोळत आहे.'
प्रश्नकर्ता : अर्थात चिखलाच्या बाबतीत अज्ञानताच आहे ना?
प्रश्नकर्ता : हो, त्या बाबतीत त्याला अज्ञानता आहे. म्हणूनच चिखलात लोळत आहे. पण तरीही जर चिखलाला समजण्याचा प्रयत्न केला तर समजेल असे आहे, परंतु तो स्वतः समजण्याचा प्रयत्नच करत नाही ना!
या जगात निर्विषयी विषय आहेत. या शरीराच्या आवश्यकतेसाठी जे काही डाळ-भात, भाजी पोळी, जे मिळेल ते खा. ते विषय नाहीत. विषय केव्हा म्हटले जाते? जेव्हा तुम्ही लुब्धमान व्हाल तेव्हा त्यास विषय म्हटले जाते. अन्यथा ते विषय म्हटले जात नाही, ते निर्विषयी