________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
दादाश्री : विवाहिताने जर ब्रह्मचर्य व्रत घेतले तर त्याला आत्म्याचे सुख कसे असते हे पूर्णपणे समजते. नाहीतर तोपर्यंत त्याला सुख विषयातून येते की आत्म्यातून येते हेच समजत नाही. परंतु ब्रह्मचर्य व्रत असेल तर, त्याला आत्म्याचे अपार सुख आत अनुभवास येते. त्याचे मन चांगले राहते, शरीर वगैर सर्वकाही चांगले राहते!
प्रश्नकर्ता : तर दोघांचीही ज्ञानाची अवस्था सारखीच असते की त्यात काही फरक असतो? विवाहिताची आणि ब्रह्मचर्यवाल्याची?
दादाश्री : असे आहे की, ब्रह्मचर्य व्रतवाला कधीही घसरुन खाली पडत नाही. त्याच्यावर वाटेल तेवढे संकट आले तरी तो घसरुन पडत नाही. त्यास सेफसाईड(सलामती) म्हटले जाते.
ब्रह्मचर्य तर शरीराचा राजा आहे. जो ब्रह्मचर्यात असतो त्याची बुद्धि किती सुंदर असते, ब्रह्मचर्य हे तर संपूर्ण पुद्गलाचे (शरीराचे) सार आहे.
प्रश्नकर्ता : हे सार असार तर होत नाही ना?
दादाश्री : नाही, पण तो सार उडून जातो, 'युजलेस' (बेकार) होऊन जातो!!! असे सार असेल, त्याची तर गोष्टच वेगळी ना! महावीर भगवानांना बेचाळीस वर्षांपर्यंत ब्रह्मचर्यसार होते. आपण जो आहार घेत असतो त्या सर्वांच्या साराचे सार हे वीर्य आहे, हे एक्स्ट्रॅक्ट(सार) आहे. आता हे एक्स्ट्रॅक्ट जर बरोबर सांभाळता आले तर आत्मा लवकर प्राप्त होतो, संसारिक दुःखं येत नाहीत. शारिरीक दुःखं येत नाहीत, अन्य कोणतीही दुःख येत नाहीत.
प्रश्नकर्ता : ब्रह्मचर्य हे तर अनात्मा भागात येते ना! दादाश्री : हो, पण ते पुद्गलसार आहे!
प्रश्नकर्ता : तर ते पुद्गलसार समयसाराला कशाप्रकारे मदत करते?
दादाश्री : हे पुद्गलसार असेल तरच समयसार होते, हे जे ज्ञान