________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
होत शेवटी त्याचे वीर्य तयार होते. जसे या दुधापासून दही तयार करतो, हे दही म्हणजे अंतिम परिणाम नाही. पुढे मग दहीपासून लोणी तयार होते, लोणीचे तुप तयार होते. म्हणजे तुप हे अंतिम परिणाम आहे. तसेच यात ब्रह्मचर्य, हे संपूर्ण पुद्गलसार आहे !
2
म्हणून ह्या जगातील दोन वस्तूंना वाया घालवू नये. एक म्हणजे लक्ष्मी आणि दुसरे वीर्य. जगातील लक्ष्मी (पैसे) गटारीतच जात आहे. म्हणूनच लक्ष्मी स्वत:साठी वापरु नये, विनाकारण दुरुपयोग करु नये, आणि शक्यतो ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. जो आहार घेत असतो. त्याचा अर्क बनतो व शेवटी अब्रह्मचर्यामुळे नष्ट होतो. या शरीरात अशा काही नसा असतात की, ज्या वीर्याला सांभाळतात आणि हे वीर्य या शरीराला सांभाळते. अर्थातच शक्य होईल तेवढे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.
प्रश्नकर्ता: पण अजूनही मला ही गोष्ट समजत नाही की माणसाने ब्रह्मचर्य का पाळावे ?
दादाश्री : मला माझी गोष्ट तुमच्यावर जबरदस्तीने ठासून बसवायची नाही. तुम्हाला स्वत:लाच ती समजायला हवी. ब्रह्मचर्य पाळू शकत नाही ही वेगळी गोष्ट आहे, परंतु ब्रह्मचर्याचे विरोधी होण्यासारखे नाहीच. ब्रह्मचर्य तर (मोक्षाला जाण्यासाठी, आत्मसाधनेसाठी) सर्वात मोठे साधन आहे.
मग ते जाऊ दया, लेट गो करा. ब्रह्मचर्य पाळू नका. मी काही अशा मताचा नाही. मी तर लोकांना सांगतो की जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही खुशाल लग्न करा. कोणाला लग्न करायचे असेल तर त्यात माझी काहीच हरकत नाही.
असे आहे की, ज्याला संसारिक सुखांची गरज आहे, भौतिक सुखांची इच्छा आहे. त्याने लग्न करायला हवे. सर्वच करायला हवे पण ज्याला भौतिक सुखं आवडतच नसतील आणि सनातन सुख हवे असेल, त्याने लग्न करु नये.
प्रश्नकर्ता : विवाहितांना, ज्ञान उशीरा समजते ना? आणि जे ब्रह्मचर्य पाळतात, अशा लोकांना ज्ञान लवकर येते ना ?