________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध)
खंड : 1 विषय विकाराचे स्वरुप, ज्ञानींच्या दृष्टीने
[1] विश्लेषण, विषयाच्या स्वरुपाचे प्रश्नकर्ता : निसर्गाला जर स्त्री-पुरुषाची आवश्यकता आहे तर ब्रह्मचर्य कशासाठी दिले?
दादाश्री : स्त्री-पुरुष दोघेही नैसर्गिक आहेत आणि ब्रह्मचर्याचा हिशोब हा सुद्धा नैसर्गिक आहे. मनुष्य ज्या पद्धतीने जगू पाहतो, तो स्वतः जशी भावना करतो, त्या भावनेच्या फळस्वरुपाने हे जग आहे. ब्रह्मचर्याची भावना मागील जन्मी केली असेल तर ह्या जन्मात ब्रह्मचर्याचा उदय येतो. हे जग स्वतःचे प्रोजेक्ट आहे.
प्रश्नकर्ता : परंतु ब्रह्मचर्य पाळल्याने काय फायदा होतो?
दादाश्री : जर काही लागल्यामुळे आपल्याला रक्त निघत असेल, तर त्यास आपण बंद का करतो? त्यात काय फायदा?
प्रश्नकर्ता : जास्त रक्त निघू नये म्हणून. दादाश्री : रक्त निघाले तर काय होते? प्रश्नकर्ता : शरीरात खूप अशक्तपणा येतो.
दादाश्री : त्याचप्रमाणे अधिक अब्रह्मचर्यामुळे शरीरास खूप अशक्तपणा येतो. हे सर्व रोग अब्रह्मचर्याचेच आहेत. कारण की तुम्ही जो आहार खाता, पीता, श्वास घेता, त्या सर्वांचा परिणाम होत, होत,