________________
अनंत वेळा विषय रुपी चिखलात अल्पसुखाच्या लालसेने पूर्ण माखला आणि या दलदलीत खोलवर रुतला तरीही त्यातून बाहेर निघण्याचे मन होत नाही, हे सुद्धा एक आश्चर्यच आहे ना! जे खरोखर ह्या चिखलातून बाहेर निघू पाहतात, पण मार्ग मिळत नसल्याने नाईलाजास्तव फसलेले आहेत; ज्यांना सुटण्याचीच एकमेव कामना आहे, त्यांना तर 'ज्ञानी पुरुषांचे' हे 'दर्शन' नवीनच दृष्टी प्रदान करुन सर्व बंधनातून सोडवणारे बनते.
मन-वचन-कायेच्या तमाम संगी क्रियांपासून संपूर्णपणे असंगतेच्या अनुभवाचे प्रमाण अक्रम विज्ञान प्राप्त झालेल्या विवाहितांनी सिद्ध केले आहे. विवाहीत पण मोक्षमार्ग प्राप्त करुन आत्यंतिक कल्याण साधू शकतात. 'गृहस्थाश्रमात मोक्ष!!!' हे विरोधाभासी वाटते, परंतु तरीही सिद्धांतिक विज्ञानाद्वारे विवाहित सुद्धा मार्ग प्राप्त करु शकले आहेत, हे वास्तविकतेत प्रमाणभूत रुपाने शक्य झाले आहे. अर्थात 'गृहस्थीपणा मोक्षमार्गात बाधक नाही?!' याचे प्रमाण तर असेल ना? या प्रमाणाला प्रकाशित करणारी वाणी उत्तरार्ध खंड : १ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
'ज्ञानी पुरुषांकडून' 'स्वरुपज्ञान' प्राप्त विवाहितांसाठी की जे विषय-विकार परिणाम आणि आत्मपरिणामाच्या सांध्यावर जागृतिच्या पुरुषार्थात आहेत, त्यांना ज्ञानी पुरुषांच्या विज्ञानमय वाणीने विषयांच्या जोखिमांसमोर सतत जागृती, विषय विकारासमोर खेद, खेद आणि खेदच तसेच प्रतिक्रमणरुपी पुरुषार्थ, आकर्षणाच्या वातावरणात बुडल्याशिवाय बाहेर निघण्याची जागृति देणारी समजचे सिद्धांतिक समज की ज्यात 'आत्म्याचे सूक्ष्मतम स्वरुप, त्याचा अकर्ता-अभोक्ता स्वभाव' तसेच 'विकार परिणाम कोणाचा? विषयाचा भोक्ता कोण? आणि भोगल्याचे डोक्यावर घेणारा कोण?' या सर्व रहस्यांचे स्पष्टीकरण कुठेही दिलेले नाही. ते इथे साध्या, सरळ आणि सहजतेने लक्षात येईल अशा शैलीत दर्शविण्यात आले आहे. ही समज थोडीशीही शर्त चूक झाल्याने सोन्याच्या कटारीसारखी बनून जाते. त्याचे सर्व जोखिम आणि निर्भयता प्रकट करणारी वाणी उत्तरार्धाच्या खंड : २ मध्ये प्रस्तुत केली आहे.
सर्व संयोगांत अप्रतिबद्धपणे विचरत राहून, महामुक्तदशेत रमलेल्या