Book Title: Brahmcharya Sankshipt Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 9
________________ संपादकीय विषय-विकाराचे वैराग्यमय स्वरुप समजण्यापासून ते थेट ब्रह्मचर्याचे स्वरुप, तसेच त्याच्या यथार्थ अखंड प्राप्तीपर्यंतच्या भावना असलेल्या वेगवेगळ्या साधकांसोबत, प्रकट आत्मवीर्यवान ज्ञानी परम पूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेली अद्भुत ज्ञान वाणी जी फक्त वैराग्यालाच जन्म देणारी नाही, तर विषयबीजाला निर्मूळ करुन निग्रंथ बनवणारी आहे, त्याचे संकलन इथे करण्यात आले आहे. साधकांची दशा, स्थिती आणि समज यांच्या पातळीच्या आधारे निघालेल्या वाणीला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संकलित करण्यात आले आहे की ज्यामुळे वेगवेगळ्या 'स्तरावर' निघालेली गोष्ट प्रत्येक वाचकाला अखंडितपणे संपूर्ण मिळावी, अशा पद्धतीने 'समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य' ग्रंथाला (मूळ गुजराती भाषेत) पूर्वार्ध-उत्तरार्धात विभाजित करण्यात आले आहे. पूर्वार्ध खंड : १ मध्ये विषयाचे विरेचन करणारी जोरदार, सचोट आणि प्रत्येक शब्दात वैराग्य उत्पन्न करणारी वाणी संकलित केली आहे. सामान्यपणे जगात, 'विषयात सुख आहे' अशी जी भ्रांती आहे तिला तोडून टाकणारी, इतकेच नाही, तर 'खरी दिशा कुठे आहे ? आणि कोणत्या दिशेत चालत आहोत?! याचे संपूर्ण भान करुन देणाऱ्या हृदयस्पर्शी वाणीचे संकलन इथे करण्यात आले आहे. पूर्वार्ध खंड : २ मध्ये ब्रह्मचर्याचे परिणाम ज्ञानींच्या श्रीमुखाने ऐकल्यामुळे त्यावर आफरीन झालेला साधक ब्रह्मचर्याच्या वाटेने पाऊल टाकण्याची हिंमत दाखविण्याचे साहस करतो आणि ज्ञानी पुरुषांचा योग साधून सत्संग सानिध्य, प्राप्त झाल्याने मन-वचन-कायेने अखंड ब्रह्मचर्यात राहण्यासाठी दृढ निश्चयी बनतो. ब्रह्मचर्याच्या मार्गावर चालण्यासाठी आणि विषयाच्या वटवृक्षाला मूळासकट उपटून निर्मूळ करण्यासाठी त्या मार्गात येणाऱ्या दगडांपासून ते डोंगरापर्यंतच्या विघ्नांसमोर तसेच डगमगणाऱ्या निश्चयापासून ते ब्रह्मचर्य व्रतापासून जरी च्युत झालेला असेल (मागे पडला असेल) तरी त्याला जागृतीच्या सर्वोत्कृष्ट श्रेण्या पार करवून निग्रंथपद प्राप्त करवितात, इथपर्यंतची वैज्ञानिक दृष्टी ज्ञानी पुरुष उघडतात आणि फुलवतात!!!

Loading...

Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 ... 110