________________
आत्मा सहेतुक-अहेतुक दोन्ही प्रकाराने नाश पावत नाही, असे सांगणारे नित्यवादी, नियतिवादी ठरले. कर्म परिणामाची चिकित्सा न करता कर्मकांड अनुष्ठानाला महत्त्व दिले, कर्म बंधनाची तीन कारणे, कृत-कारित अनुमोदन मानले, भावाच्या विशुद्धीने कर्म तुटले, कर्मबंध नसल्याने मोक्षगामी झाले, ज्ञानाचा निषेध करून क्रियेनेच स्वर्ग-मोक्ष मानणारे क्रियावादी बनले.
समीक्षा
साऱ्या वादींचे मत जाणून भगवंतांनी सूक्ष्म समीक्षा केली आणि सरळ, सोप्या भाषेत दृष्टांत देऊन गहन अर्थाची शिदोरी दिली. १) अंधाच्या हातात दिवा दिला तर तो अंधाराशिवाय काय पहाणार ? तसेच
अज्ञानाच्या अंधाराने घेरलेल्याला ज्ञानाची वाट कशी दिसणार ? बंधन आणि मुक्तीचे ज्ञान नसलेला मूर्ख हरीण जेथे नको तेथे अडकतो
आणि दुःखाला आमंत्रण देतो. तसेच दहा प्रकारच्या धर्माला न जाणणारा, क्रोध, मान, माया, लोभ आणि कषायाच्या फाफट पसाऱ्यात अडकून दुःखाला ओढून घेतो. आंधळ्याच्या मागे आंधळा चालत राहिला तर इच्छित स्थानावर कधी
पोहोचणार तसेच अधर्माच्या रस्त्याने जाणारा मोक्षाला कधी गाठणार ? ४) पिंजऱ्यातला पक्षी पिंजराच सोडत नाही तसे अज्ञानी आपल्या मिथ्यामान्यतेची ___ कासच सोडत नाही आणि संसारातून मुक्त होण्याचा मार्गही पहात नाही.
जन्मांध मनुष्य छिद्र पडलेल्या नौकेत बसून नदी पर करण्याची इच्छा करतो परंतु मध्येच नौकेत पाणी भरल्याने डुबतो तसेच मिथ्यादृष्टी अनार्य