Book Title: Arddhmagadhi Aagama che Vividh Aayam Part 01
Author(s): Nalini Joshi
Publisher: Firodaya Prakashan

View full book text
Previous | Next

Page 237
________________ ६ ) आचारश्रुत अध्ययन साधूंच्या वाक्संयमाचा उल्लेख करताना तो केवळ त्यांचा न राहता, सर्व मानवांना लागू पडतो. कारण आजच्या अतिसंवेदनशील युगात बोलण्यावर लगाम घातला नाही तर काय घडते, हे पदोपदी आपण अनुभवत आहोत. सामाजिक शांतता व सलोख्यासाठी वचनगुप्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ७ ) आर्द्रकीय अध्ययन - समवशरणमधील वेगवेगळ्या मतप्रवाहातील काही संप्रदायांच्या विचारधारांनी, जैनांना दिलेले आवाहन यात दिसून येते. महावीरांना कधीही न पाहिलेल्या आर्द्रकाला, आपल्या संप्रदायात सामील करण्यासाठी गोशालक, बौद्ध, वैदिक ब्राह्मण, सांख्यश्रमण व हस्तितापस यांचे प्रयत्न. त्यातही महावीरांचा सहवास लाभलेला गोशालक महावीरांवर जास्त प्रकाश टाकतो. इतर अन्यमती मात्र आहारचर्चेतच अडकून राहतात, ही यातील मोठी उणीव दिसते. पण अन्यमतावलंबियांच्या मतांचा जसाच्या तसा उल्लेख करणे, यात जैनदर्शनाचा 'उदारमतवादी' दृष्टिकोण दिसून येतो, जो आपल्या वागण्यात आणला पाहिजे. — आचारांगाची सुरवात ‘षड्जीवनिकाय व त्यांच्या रक्षेने' झाली तर सूत्रकृतांगाचा शेवट 'षड्जीवनिकायांच्या रक्षेनेच' झाला आहे. अशा प्रकारे आचारांग व सूत्रकृतांगाच्या सर्व अध्ययनातून समता व अहिंसेचा अंत:प्रवाह झुळझुळत आहे. त्याला प्रत्याख्यानाची जोड देऊन दैनंदिन जीवनाचा एक भाग बनविण्याचे मोठे कार्य केले आहे. हाच आशय बाकीबाब (कविवर्य बा. भ. बोरकर) आपल्या सुंदर कवितेतून व्यक्त तो असा की 'जीवन त्यांना कळले हो, मीपण ज्यांचे पक्व करतात. फळापरि, सहजपणाने गळले हो. ' २२९ -

Loading...

Page Navigation
1 ... 235 236 237 238 239 240