________________
(१९) मला भावलेले आचारश्रुत
लीना संचेती
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे व आजचे युग हे व्यावहारिक व वैज्ञानिक युग आहे. विज्ञानात कार्य-कारण- भाव (cause-effect-relation) असल्याने आपले म्हणणे पटवून देण्यात तो यशस्वी झाला आहे. तरीसुद्धा सत्कार्यवाद व असत्कार्यवाद ह्या दोन दृष्टिकोनांमुळे काही गोष्टी विज्ञानाला सुद्धा गृहीतच मानून चालाव्या लागतात.
दार्शनिक जगात जेथे जेथे ज्ञान व सम्यक्त्वाचे वर्णन येते तेथे तेथे आचाराचेही वर्णन येतेच. सूत्रकृतांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधातील 'आचारश्रुत' अध्ययनात आचार-अनाचार, नवतत्त्व, षट्द्रव्य याविषयी चर्चा तर आहेच पण त्याचबरोबर अनेकांतवादी दृष्टिकोणाची सीमारेषा व वाणीचा विवेक हेही या अध्ययनाचे वैशिष्ट्य आहे.
आचारश्रुत अध्ययन आवडण्याचे कारण असे की, यात विज्ञानासारखी अनेक कृत्ये, Theory of Relativity सारख्या अनेक संज्ञा आहेत. परिभाषा जरी वेगळी असली तरी साम्यही आहे. 'शून्यवाद', 'मायावाद' या गोष्टी जैनांना मान्य नाहीत. सूत्रकाराने यात अस्तित्वातील आधारभूत तत्त्वांवर, 'साधूंनीच काय तर कोणत्याही सामान्य व्यक्तिनेही एकांगी विचार करू नये', अशा गोष्टींची यादी जोडीरूपाने दिली आहे. भ. महावीरांनी 'इइ दिट्ठि न धारए', 'इति वायं न नीसरे' - अशा प्रकारे कोणती दृष्टी धारण करावी व कशाप्रकारे वाणीचा संयम ठेवावा, यावर दिलेला भर दिसून येतो.
जगातील सगळ्या भूमिती या मानवी मनाच्या संज्ञा आहेत. 'लोकअलोक'मधील कोणाच्याही नजरेत न बसलेले 'अलोक' अस्तित्वात आहे व ही
२३०