________________
(१८) सूत्रकृतांग ( २ ) : एक चिंतनसप्तक
अर्जुन निर्वाण
सूत्रकृतांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधात एकूण सात अध्ययने आहेत. यातील काहीशा वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींचा अध्ययनक्रमाने केलेला हा विचार -
—
१) पुंडरीक अध्ययन एका सरोवराच्या मध्यभागी असणाऱ्या सुंदर कमळाच्या प्राप्तीसाठी चारही दिशांनी आलेल्या पुरुषांनी केलेले प्रयत्न व त्यांना त्यात आलेले अपयश. तर एका भिक्षूने केवळ तीरावर उभे राहून आवाहन करताच, त्या कमळाचे स्वत:हून त्याकडे जाणे असा हा दृष्टांत.
या दृष्टांतात आजच्या आधुनिक 'व्यवस्थापन शास्त्रातील' काही रहस्ये दडलेली आहेत, असे मला जाणवले. 'जो उत्कृष्टतेचा ध्यास घेतो, त्याचे ध्येय आपणहून त्याकडे येते', असा संदेश यात दिलेला दिसतो. परंतु त्यासाठी ‘न थकता अविरत परिश्रम करण्याचा मंत्रही जपायला हवा, याचे दिग्दर्शनही यात आढळते. व्यवस्थापन शास्त्रातल्या विद्वानांनी या भूमिकेतून हे अध्ययन अभ्यासायला हवे. '
२) क्रियास्थान अध्ययन
पहिल्या अध्ययनातील ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने केलेले प्रयत्न म्हणजे 'क्रियास्थान' अध्ययनातील 'कर्मांचे प्रकार'. यातही भर दिलेला आहे तो वाईट क्रियास्थानांवर. असे का असावे ?
कोणाही व्यक्तीला भुरळ पडते ती अशा इतरांचे अप्रिय होणाऱ्या गोष्टींची. त्यातून कदाचित आसुरी समाधान मिळत असावे. उदा. दूरदर्शनवरील सर्व महिलाप्रिय मालिका, गुन्हेगारीविषयक बातम्या इ. याचा दूसरा पैलू असाही असू शकतो की माणसाला त्याच्या वाटेवरील
२२७
-
—
-