________________
(८) आचारश्रुत अध्ययन : एक चिंतन
सुमतिलाल भंडारी
सूत्रकृतांग (२) मधील 'आचारश्रुत' अध्ययन हे अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या अध्ययनात साधूंच्या आचाराचे अथवा दुराचाराचे व्यावहारिक वर्णन नाही, तर सैद्धांतिक अनाचाराचे वर्णन आहे. दृष्टी व वचनाचा अनाचार म्हणजेच सैद्धांतिक अनाचार म्हणजेच एकान्तवाद. या अध्ययनात एकान्तवादाचे खंडन करून, त्याचा अव्यवहारीपणा दाखविला आहे. त्याचबरोबर अनेकान्तवादाचा व्यवहारीपणा सांगून त्याचाच वापर साधूंनी करावा असा परामर्श दिला आहे. वाणीसंयमाचे महत्त्व सांगून स्याद्वाद हाच वाणीचा आचार आहे, असे सांगितले आहे. अनेकान्तवाद व वाणीसंयम या गोष्टी साधूंकरिता त्याच्या दैनंदिन व्यवहारात, आचारात व जनसंपर्कात कशा महत्त्वपूर्ण आहेत हे सांगितले आहे. तसेच या गोष्टी केवळ धर्मात शिकावयाची तत्त्वे नसून, जीवन जगावयाची तत्त्वे आहेत, हे पटवून दिले आहे. त्यामुळे हे अध्ययन साधूंकरिता तर आहेच आहे, पण हे जनसामान्यांकरिताही आहे, हे जाणवते व हेच या अध्ययनाचे फलित आहे.
अनेकान्ताविषयी सांगताना महावीरांनी म्हटले आहे की, संपूर्ण सत्य जाणून घ्यायचे असेल तर कोणत्याही गोष्टीचा विचार एकाच दृष्टिकोणातून करून चालणार नाही. त्या गोष्टीला अनेक बाजू असू शकतात. त्या द्रव्य, क्षेत्र, काल, भाव यांच्याशी निगडित असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट एकांगी नित्य अथवा एकांगी अनित्य असूच शकत नाही. याच दृष्टीने सांख्यांचे 'एकान्तनित्य' तत्त्वज्ञान अथवा बौद्धांची 'एकान्त - दुःखमय' संकल्पना या अयोग्य वाटतात. महावीरांनी या दोन्ही संकल्पनांचा निषेध केला आहे व म्हटले आहे की
१९५
-